July 26, 2024
Home » महिलेला चालत्या ट्रकमधून रोडवर फेकले; करोडी जवळील घटना

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा

दौलताबाद : चालत्या ट्रकमधून महिलेला रोडवर फेकल्याची धक्कादायक घटना करोडी जवळील रिंग रोडवर घडली.ही घटना दि १२ रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भानुप्रसाद दुगलाल गौतम वय ३९ राहणार मोहदीपूर प्रतापगंज बाजार तालुका जिल्हा सुल्ताणपुर उत्तरप्रदेश याने एका महिलेला कोपरगाव येथून ट्रकमध्ये बसवून घेतले करोडी जवळ येताच अचानक ट्रक मधून एका महिलेला खाली फेकल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक विनोद सलगरकर, सहायक पोलिस निरीक्षक संजय गीते,उपनिरीक्षक आयुब पठाण,पोलीस अंमलदार निलेश पाटील,बंडू गोरे,ज्ञानेश्वर कोळी,सुनील घुसिंगे,सतीश मादमकर घटनास्थळी धाव घेऊन जखमी अवस्थेत असलेल्या महिलेला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले, अधिक चौकशी केली असता तो ट्रक MH15 HH 7999 या क्रमांकाचा असून पोलिसांना आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संजय गीते हे करत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!