July 19, 2024
Home » रांजनगाव (शेपु) येथे मारहान करून जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना लवकरात लवकर अटक करा – वाळूज महानगरातील सराफ संघटनेची मागणी

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा
वाळूज महानगर : वाळूज महानगरातील रांजनगाव शेनपुंजी येथे भरदिवसा मुकूंद बेंद्रे यांच्या मंगलमूर्ती ज्वेलर्स मध्ये घुसून 12 लाख 40 हजार रुपये किमतीचे 200 ग्राम सोन्याचे ऐवज लांपास केले आहे. या घटनेला दोन दिवस उलटूनही आरोपी पोलिसांच्या ताब्यात नसल्याने आज (दि 10) रोजी वाळूज महानगर सराफ सुवर्णकार संघटनेकडून पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे

निवेदनात लिहले आहे की, वाळुज महानगर मधिल सर्व सुवर्ण व्यापारी आपणास या निवेदनाव्दारे विनंती करतो की, दि.०८ मंगळवार रोजी रांजणगांव (शे. पुं.) येथिल मंगलमुर्ती ज्वेलर्स येथे सकाळी १०.३० च्या सुमारास जी जबरी चोरी करुन सोन्या व चांदीचा ऐवज लुटुन नेला व दुकान मालक मुकूंद बेंद्रे यांच्यावर चाकु हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. हि घटना अतिशय भयावह आहे. सदरील घटनेत मंगलमुर्ती ज्वेलर्सचे मालक मुकूंद बेंद्रे यांच्या दुकानातुन त्यांच्या सांगण्यावरून ८०० ग्रॉम (आठशे ग्रॉम) मालाची चोरी झाली आहे. अशा घटना जर दिवसा ढवळ्या घडत असतिल तर व्यवसायीक मित्राने व्यवसाय करणे आवघड होईल. सदरील घटने मुळे व्यापारी वर्ग प्रचंड दहशती खाली आहे. आपणास संपुर्ण सराफा व्यापारी संघटने तर्फे विनंती की, सदरील घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करून चोरीचा मुद्दे माल जप्त करून मंगलमुर्ती ज्वेलर्स चे मालक मुकूंद बेंद्रे यांना न्याय मिळवुन द्यावा. त्यामुळे व्यापारी वर्गात नविन आशा निर्मान होईल निवेदन देताना राजेश धुमाळे, महावीर धुमाळे, राजू शहाणे,सूरज सूर्यवंशी, दौलत दादा, अर्जुन सूर्यवंशी, महेश बेंद्रे, विलास श्रीमये, सत्यवान कदम, संजय शहाणे, गिरीश कपाळे, चेतन सूर्यवंशी, राजाराम जाधव, सुरेश आंबीलवादे, उदावंत मामा, राजू श्रीमाळी, सुजित पंडित,अनिल मगर यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!