July 26, 2024
Home » अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या तरुणाविरोधात वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

न्युज मराठवाडा वृत्तसेवा

वाळूज महानगर : पोलीस ठाणे एमआयडीसी वाळूज छत्रपती संभाजीनगर येथील अल्पवयीन मुलीस पळुन नेत बलात्कार करणाऱ्या विरोधात गुन्हा करुन करण्यात आली आहे, आरोपीला न्यायालयाने हजर केले असता ४ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात अली आहे. अक्षय हिमंत राठोड वय २० वर्ष , रा.ठि. पिंपरखेड ता. सिंदखेड राजा, जि.बुलढाणा, ह.मु. घर नं.98, इंद्रप्रस्तकॉलनी बजाजनगर छत्रपती संभाजीनगर असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलगी अल्पवयीन आहे हे माहिती असतांना सुध्दा तिला लग्नाचे अमिष दाखवून तिचे पालकाच्या संमतीशिवाय पळून नेत तिच्या सोबत बळजबरीने शारिरीक संबंध प्रस्तापीत केले.या प्रकरणी आरोपी तरुणाविरोधात कलम 363,366, 366अ, 376(2)(एन) भा द वि सहकलम 3,4, पोक्सो प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीसन निरीक्षक श्री अविनाश आघाव, यांनी पोलीस ठाणे MIDC वाळुज येथील चार्ज घेतल्या पासून अल्पवयीन मुलींना फुसलावून पळवून घेवून जाणाऱ्या आरोपीस अटक करून जेल मध्ये पाठवण्याचा धडका सुरु केलेला आहे. आरोपीला कायदयाचा धाक दाखवला जात आहे. सदरची कामगिरी ही अविनाश आघाव वरिेष्ठ पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शना खाली तपास अधिकारी संदीप शिंदे पोलीस उपनिरीक्षक, पोअं.3135 सुरेश कचे, पोअं. 1121 यशवंत गोबाडे, पोअं. सुरज अग्रवाल, हनुमान ठोके, रोहित चिंधाळे, महिला पो.अं. प्रियंका तळवंदे यांनी केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!