July 23, 2024
Home » दरोडा टाकण्याच्या तय्यारीत असलेले आरोपी वाळूज एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा :
वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रीच्या वेळेस पेट्रोलींग करत असतांना दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले आरोपी वाळूज एमआयडीसी पोलिसांनी अटक केले आहे ही कारवाई ( दि २ ) रोजी रात्री ०२.३० वाजताच्या सुमारास बजाजनगरमध्ये करण्यात आली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बजाजनगर येथील नांद्रे आबा चौक हायटेक कॉलेज रोडवर दोन मोटर सायकलवर पाच व्यक्ती संशयीत रित्या येतांना दिसले. राञगस्तचे अधिकारी व अंमलदार यांना संशय आल्याने त्यांच्या मागे मागे पिटर मोबाईने लावली, त्यांनी त्यांच्या मदतीला डायल ११२ जिप चे अंमलदार चालक पंकज साळवे, अमोल मनोरे, यांना बोलावून घेतले. दोन्ही वाहनाने संशयीत आरोपीतांचा मोटर सायकलच व आरोपी हे नाना नानी पार्क मैदानाच्या जवळ दोन्ही मोटर सायकलला वाहने आडवी घालून आडवले. त्या वेळी चार जणाना जागीच पकडले, व एक आरोपी पळून गेला. पकडलेल्या आरोपीतांना त्यांची नाव पत्ता विचारला असता त्यांनी त्यांचे नाव करण मारोती गायकवाड वय २२ वर्ष, रा. वडगांव को. आकाश देवानंद जाधव वय २२ वर्ष, रा. मिटमिटा, आकाश संजय मंजुळ वय २१ वर्ष, रा. कनक सागज ता. वैजापूर गणेश मच्छिंद्र शिंदे वय २८ वर्ष रा. शिवराई ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर असे असल्याचे सांगीतले, परंतु पळुन गेलेल्या आरोपीचे नाव पत्ता सांगीतलेला नाही.

संशयीत आरोपीतांना पकडून त्यांची अंगझडती घेतली असतां अंगझडती मध्ये व मोटर सायकलची झडती घेतली असता एकहिरो ग्लॅमर कंपनीची लाल रंगाची मोटर सायकल क्रमांक एम- २० – एफ एस१३२८ २) एक काळ्या जांभळ्या रंगाची बजाज डिसकव्हर मो.सा. क्रमांक एम एच २० – सी एक्स् ५१६०, लोखंडी सब्बल दोन फुट लांबीची एक रामपुरी चाकू, एक सुरा, एक नायलॉन दोरी पिवळ्या रंगाची, एक काळ्या रंगाचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल, एक रेडमी कंपनीचा काळ्या रंगाचा मोबाईल हँन्डसेट, असा एकुण १,३७,८००/- रुपये एकुण किंमतीचा मुद्देमाल दोन पंचा समक्ष जप्ती पंचनामा करून जप्त करण्यात आलेला आहे.
असे वरील संशयीत आरोपी हे दरोडया सारखा गंभीर गुन्हा करण्याच्या उदेशाने राञीच्या वेळी दरोडयाचे साहित्यासह दरोडा टाकण्याच्या उदेशाने फिरत असतांना मिळून आले म्हणून सदर आरोपी विरुध्द पो.स्टे. एम. वाळुज येथे गु.र.नं. ६४८/२०२३ कलम ३९९, ४०२ भादंवि गुन्हा दाखल झालेला आहे. वरील प्रमाणे अटक करण्यात आलेली आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांनी या पुर्वी आनेक पो.स्टे. गुन्हे केल्याची नोंद आहे. सदरची कार्यवाही ही मा. पोलीस आयुक्त श्री मनोज लोहीया, मा. पोलीस उप आयुक्त श्री दिपक गि-हे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त श्री अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अविनाश आघाव, यांचे मार्गदर्शना खाली, श्री शेकनाथ आधाने पोलीस उपनिरीक्षक, पोअं. १३१९ सतवंत बापुसाहेब सोहळे, चालक पोअं२४८७ बबलु थोरात, डायल १९१२ जिप चे अंमलदार चालक पंकज साळवे, अमोल मनोरे, यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि / श्री गौतम वावळे हे करत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!