July 22, 2024
Home » वनरक्षक भरती परिक्षेत मुन्नाभाई पकडला; सातारा पोलिसांची कारवाई

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा

वाळूज : वनरक्षक भरती परीक्षेत आणखी एका मुन्नाभाई उमेदवाराला सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले कानात मख्खी हेडफोन लावून परीक्षेला गेला होता. विशेष म्हणजे यासाठी त्याला एक डिव्हाईस देखील देण्यात आले होते आणि या संदर्भात तब्बल तीन लाख रुपयांची डील झाल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले. सातारा पोलिसांनी या उमेदवाराला वाळूज – औरंगाबाद रोडवर असलेले एक्सलन्स कॉम्प्युटर सेंटर येथून आज( दि३) सकाळी ताब्यात घेतले असून, त्याला ते डिवाइस पुरवणारे कोण आहेत याचा शोध सातारा पोलीस घेत आहेत सतीश मदनसिंग जारवाल असे 26 वर्षीय परीक्षार्थी चे नाव असून सातारा पोलिसांनी याला ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!