July 23, 2024
Home » अट्टल दोन दुचाकी चोर वाळूज पोलिसांच्या ताब्यात; सहा दुचाकी जप्त

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा

वाळूज महानगर : वाळूज परिसरातील विविध ठिकाणहून दुचाकी चोरणारे दोन दुचाकी चोरांसह सहा दुचाकी वाळूज पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई केली असून, समर्थ विनोद काळे वय 19 वर्षे रा. फ्लॅट नं. 15, बिल्डींग A, चंदन आर्केट राजा बाजार, छत्रपती संभाजीनगर व सागर मच्छींद्र गवळी वय 25 वर्षे रा. सोलेगाव ता. गंगापुर जि. औरंगाबाद असे दोन्ही आरोपींचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसारजुन्या गुन्ह्यातील तपास सुरु असतांना रेकॉर्डवरील पाहीजे व फरार आरोपीचा शोध घेत असताना दहेगाव येथे दोन संशईत थांबवुन त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांचे नाव समर्थ विनोद काळे वय 19 वर्षे रा. फ्लॅट नं. 15, बिल्डींग A, चंदन आर्केट राजा बाजार, छत्रपती संभाजीनगर, सागर मच्छींद्र गवळी वय 25 वर्षे रा. सोलेगाव ता. गंगापुर जि. औरंगाबाद असे असल्याचे सागीतले त्यांना फिरण्याचे कारण विचारुन त्यांच्या ताब्यात असलेली होंडा कंपनीची होर्नेट मोटार सायकल क्रं MH-21-AZ-6419 मोटार सायकलचे कागदपत्राची विचारपुस करता त्यांनी पोलिसांना समाधानकारक उत्तरे दिली नाही. तसेच दुचाकीचे कोणतेही कागदपत्र सादर केले नाही. पोलीस ठाणे येथील अभिलेख तपासला असता पोलीस ठाणे वाळुज येथे चोरी गेले बाबत गु.र.नं. 251/2023 कलम 379 भा.द.वि. प्रमाणे गुन्हा दाखल असल्याने ही दुचाकी आरोपी समर्थ विनोद काळे याचे ताब्यातून जप्त करण्यात आली आहे. त्यानंतर नमुद दोन्ही आरोपीतांना पोलिसांनी ताब्यात घेवुन गुन्ह्याबाबत सखोल विचारपुस करुन त्यांना गुन्ह्यात अटक करुन नमुद आरोपीतांना याव्यतिरीक्त ईतर मोटार सायकल चोरी बाबत विचारपुस करता दोन्ही आरोपीतांनी गुन्ह्याची कबुली देवुन त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणहुन चोरी केलेल्या खालील प्रमाणे दुचाकी व गुन्हा करण्यासाठी वापरलेली एक दुचाकी आरोपी सागर मच्छींद्र गवळी याने त्यांचे घराचे बाजुचे प्लॉटवरुन चोरलेल्या चार मोटार सायकली व गुन्ह्या करण्यासाठी वापरलेली एक दुचाकी अशा एकुण पाच मोटार सायकली काढुन दिल्या. तसेच आरोपीतांनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली दुचाकी अशा एकुण सहा मोटारसायकल काढुन दिल्याने त्या जप्त करण्यात आलेल्या आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस उप-आयुक्त दिपक गिऱ्हे,सहायक पोलीस आयुक्त अशोक थोरात, पोलीस निरीक्षक श्रीमती गिता बागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप- निरीक्षक भगवान मुजगुले, पोह/ अभिमन्यु सानप, पोअं. / आनंद वाहुळ, नितिन धुळे, विजय पिंपळे, श्रीकांत सपकाळ, अमोल गायकवाड, स्वप्निल खाकरे, विजय त्रिभुवन यांनी केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!