July 18, 2024
Home » डोळ्यात मिर्चीपावडर टाकून, चेहऱ्यावर फायटर मारून लुटले; वडगाव कोल्हाटी येथील घटना

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा

वाळूज महानगर : वडगाव कोल्हाटी येथे डोळ्यात मिर्चीपावडर टाकून तोडावर फायटर मारून लुटल्याची घटना सलामपूरे नगर येथे दि १ ऑगस्ट रोजी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडगाव कोल्हाटी येथील सलामपूरे नगर येथे पुडलिक पराशरम साळे यांची पीठाची गिरणी आहे, तेथे काम करत असतांना (दि १ ) रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास साळे यांच्या ओळखीचे अमोल गायकवाड व अनिकेत गायकवाड हे आले त्यातील अमोल याने दारुपिण्यास पैसे मागितले ते साळे यांनी दिले नाही त्यावरून शिवीगाळ करत खिशातील फायटर काढून साळे यांच्या चेहऱ्यावर मारले व बाजुला असलेली लाकडी बळजबरीने पेटीमधून साडेआठशे रुपये घेतले त्याला विरोध करत असतांना मारहाण करत खिशात असलेली मिरची पावडर साळेयांच्या डोळ्यात टाकली. शेजारी राहत असलेल्या नागरिकांच्या मदतीने साळे यांची सुटका झाली. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात कलम ३९४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन पागोटे हे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!