July 18, 2024
Home » कुरेशी मृत्यूस कारणीभूत वाळूजचे सरपंच पतीवर गुन्हा दाखल करा – रिपाई व खाटीक संघटनेची मागणी.


न्यूज मराठवाडा वृत्तसेवा :
वाळूज : येथील शेतकरी मुस्ताक कादर कुरेशी यांच्या शेतात बळजबरी अतिक्रमण केले तसेच सदरची जागा वादग्रस्त आहे असे भासवून विक्री व्यवहार रोखून मानसिक प्राताडणा केल्याने तणावग्रस्त मुस्ताक कुरेशी यांचे नुकतेच ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेले वाळूजचे सरपंच पती पठाण सदस्य असलेला मुलगा फिरोज पठाण यांच्यासह अन्य तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. नसता आपल्या पोलीस ठाण्यासमोर 28 जुलै पासून आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा वाळूज पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) व खाटिक संघटना महाराष्ट्र यांच्यातर्फे करण्यात आली आहे. येथील गट नंबर 271 मध्ये मुस्ताक कुरेशी व भावंडाची वडीलोपार्जित जमीन आहे. यातील काही जमीन त्यांनी आर डी पी डेव्हलपर्स लिमीटेड मर्फत विकास काकासाहेब पठाडे यांना १९ जानेवारी २३ खरेदीखत द्वारे विक्री केली आहे. तर काही जमीन चा खरेदी खरेदी विक्रीचा व्यवहार करणे बाकी होते. मात्र अचानक येथील महिला सरपंचाचा पती नबी उमर पठाण, फिरोज नबी पठाण, कयूमखान मेहताब खान पठाण, नावेद खान पठाण, उमर गुलाम दस्तगीर कुरेशी यांनी येथील काही जागेवर कोणताही संबंध नसताना. खोटी कागदपत्रे द्वारे ताबा करून अतिक्रमण केले होते. व या जागेवर आपला दावा सांगत वाद निर्माण केला होता. दरम्यान विकासक विकास पठाडे यांनी या सर्व लोकांवर खंडणी मागितल्याचा गुन्हा देखील दाखल केलेला आहे. हेतू पुरस्कर वाद निर्माण केल्यानंतर व्यवहार होत नाही या विवंचनेत मुस्ताक कुरेशी हे सतत तणावाखाली होते. अनेक वेळा या लोकांच्या मानसिक त्रासामुळे त्यांना दवाखान्यात दाखल करावे लागले होते. मानसिक छळाने ते सतत तणावग्रस्त व चिंताग्रस्त राहत होते. या धक्क्यातच 17 जुलै 23 रोजी त्यांना हृदयविकाराचा जोरदार धक्का आला त्यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी वेळीच जर या भूखंड माफियावर कारवाई केली असती तर कुरैशी यांचे प्राण वाचू शकले असते असा आरोप देखील निवेदनात करण्यात आला आहे. या निवेदनावर महाराष्ट्र प्रदेश बक्कर कसाब खाटीक संघटनाचे समीर जावेद कुरेशी , मेहता चा मुलगा शाहरुख मुस्ताक कुरेशी आदींच्या सह्या आहेत.

Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

Huren Slowakei – Erotische Schönheiten

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!