July 23, 2024
Home » भरधाव टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार पोलिसाचा मृत्यूनागपूर-मुंबई महामार्गावरील सुलतानाबाद गावाजवळ घडला अपघात

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा

गंगापूर : भरधाव टँकरने दिलेल्या धडकेत मोटारसायकलस्वार पोलिस कर्मचाऱ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही दुर्घटना नागपूर-मुंबई महामार्गावरील सुलतानाबाद गावाजवळ बुधवारी सकाळी घडली. अमोल गोरे (रा. बोरसर ता. वैजापूर) असे अपघातात ठार झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
बोरसर येथील पोलिस कर्मचारी अमोल गोरे हे मोटारसायकलने ( क्रमांक एम.एच१६ सी.पी ५७०८) कर्तव्यावर छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जात हाेते. दरम्यान, विरूद्ध दिशेने वैजापूरकडे येणाऱ्या (एम.एच ४१ ए.यू २४०२) पेट्रोलच्या टँकरने सुलतानाबाद गावाजवळ दुचाकीला जोराची धडक दिली. त्यामुळे गाेरे हे लांब रस्त्याच्या कडेला झाडात पडले. याची माहिती मिळताच शिल्लेगाव ठाण्याचे पोलिस कर्मचारी संतोष पवार, अर्जुन तायडे व रवींद्र सोनवणे यांनी धाव घेतली अाणि गंभीर अवस्थेत त्यांना लासूर स्टेशन येथील खासगी हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करून छत्रपती संभाजीनगर येथील खासगी दवाखान्यात हलवले, तेथे उपचार सुरू असताना सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला आहे. शिल्लेगाव पोलिसांनी पेट्रोलचा टँकर जप्त केला असून रात्री उशिरापर्यंत टँकर चालकावर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.

——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!