July 17, 2024
Home » रांजणगावात गोळीबार; एकाला गुडघ्याला गोळी लागून गंभीर जखमी; दोघांवर गुन्हा दाखल

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा

वाळूज महानगर : वाळूज परिसरातील वडगाव कोल्हाटी येथील तलवारीने मारहाणीचे प्रकरण ताजे असतांना रांजणगाव येथे गोळी मारून एकाला गंभीर जखमी केल्याची घटना दि २५ रोजी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास रांजणगाव शेणपुजी सावता माळी मंदिराजवळ ता.गंगापूर जि.छत्रपती संभाजीनगर येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अर्जुन राजू काळे वय 22 वर्षे, व्यवसाय-मजुरी राहणार रांजणगाव शेणपुजी सावता माळी मंदिराजवळ तालुका गंगापूर जि.छत्रपती संभाजीनगर,
यांची चुलत बहीण आरोपीने पळवून घेऊन गेल्याने ,त्यावरून त्यांनी अर्जुन काळे यांच्या भावाच्या फोनवर संपर्क केला असता शिवीगाळ केली त्यावरून त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला असता तो अचानक घरी येऊन माझ्या भावाला मारण्याच्या उद्देशाने गावठी कट्ट्यातून गोळी झाडली असता बंद केलेल्या शटर मधून अर्जुन काळे याच्या गुडघ्याला लागली व जखमी केले. याप्रकरणी आरोपी श्रावण सुरेश पिंपळे रा. नायतळा ता. निफाड जि. नाशिक
व एक अनोळखी व्यक्तीवर वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन पागोटे हे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!