July 17, 2024
Home » अश्लील कृत्य करत तो चोरायचा महिलांचे अंतर्वस्त्र; वाळूज महानगरमधील एक घाणेरडा प्रकार उघड, कारण ऐकून थक्क व्हाल ….

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा
वाळूज महानगर : वाळूज महानगरमधील एका अपार्टमेंटमध्ये सतत महिलांचे अंतर्वस्त्र, चपला बुट चोरी जाण्याचा प्रकार घडत होता, लावलेल्या सिसिटीव्ही कॅमेरात बघितले असता वेगळाच प्रकार आला समोर दरम्यान आज दिनांक २२ जुलै रोजी दुपारी कॅमेरात दिसत असलेला तरुण काही नागरिकांच्या लक्षात आला नागरिकांनी त्याला पकडून चांगलाच चोप दिल्याचे पोलिसांनी सांगितले, घटनेची माहिती दामिनी पथकाला मिळताच पोलीस नाईक निर्मला निंभोरे, रूपा साकला, पोअ. मनीषा बनसोडे, सोनाली निकम यांनी घटनास्थळी धाव घेत त्या तरुणाला ताब्यात घेतले.

तो का करत होता असे कृत्य –
तरुण हा वाळूज महानगरातील रहिवाशी असून त्याचे अद्याप लग्न झालेले नाही, घरच्यांना वारंवार सांगूनही घरचे ऐकत नसल्याने तो असे कृत्य करत असल्याचे त्या तरुणाकडून कळाले. या प्रकरणी पोलीस ऍक्ट नुसार कारवाई करण्यात आली असल्याचे वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी सांगितले

—-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!