July 26, 2024
Home » दोन दुचाकीची समोरासमोर धडक; दोघेही ठार, बजाजनगर येथील घटना

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा
वाळूज महानगर : कामगार चौकाकडून प्रताप चौकाकडे येत असतांना दोन दुचिकींची प्रताप चौकात येताच समोरासमोर धडक झाली, यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. ही घटना दि २१ जुलै रोजी रात्री साडेसाह वाजेच्या सुमारास घडली.

संजय रामदास बोरुडे वय२२, रा. रांजणगाव शेणपुंजी व दुसरा एक अनोळखी तरूण असा दोघांचा मृत्यू झाला आहे. अधिक माहिती अशी की MH -20 GJ 6025 या मोटरसायकलवर चालक संजय रामदास बोरुडे व त्याचा मित्र कल्याण प्रभाकर मानकापे असे कामगार चौक वरून प्रताप चौकाकडे येत असताना विरुद्ध बाजूला MH -20AM 9117 या मोटरसायकल वरी चालक अनोळखी एकमेकांची जोराची धडक झाली. जोरात आवाज झाल्याने नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी मनोज जैन व नागरिकांचा मदतीने जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केले असता दोन्ही मोटरसायकल वरील चालक घाटी मध्ये उपचार चालू असताना मयत झाले आहे
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल निर्वळ हे करीत आहे.

——-

*Adv.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!