July 23, 2024
Home » वाळूज महानगरात बसथांब्याची पाहणी

लांब पल्ल्याच्या बस थांबविण्यासाठी केली होती मागणी

(न्युज मराठवाडा वृत्तसेवा) :वाळूज महानगर 

वाळूज महानगर १ व २ येथे लांब पल्ल्याच्या बस थांबवण्यासाठी केलेल्या नागरिकांची मागणी लक्षात घेऊन मंगळवार १८ जुलै रोजी विभाग नियंत्रक कार्यालयाकडून येथील बसस्थानकाची पाहणी करण्यात आली. या वेळी सिडको वाळूज महानगरमधील बसस्थानक, उद्योग आयकॉन, तिरंगा चौक या ठिकाणी बस थांबवण्यासाठी जागेची पाहणी करण्यात आली.

यावेळी विभागीय वाहतूक अधिकारी पंडित चव्हाण, विभागीय वाहतूक अधीक्षक स्वाती घोडे, वाहतूक निरीक्षक सुभाष भापकर, पी. हिवराळे आदींनी बस थांब्याची पाहणी केली. वाळूज महानगर परिसरात बस थांबा नसल्याने लांब पल्ल्याच्या वस थांबत नाही. त्यामुळे येथील कामगार, विद्यार्थी व नागरिकांना त्रास सहन करावा लागतो; तसेच बस थांबा नसल्याने प्रवाशांना बस पकडण्यासाठी थांबेल त्या दिशेने धावपळ करावी लागते. यासाठी वाळूज महानगर बचाव कृती समितीचे अध्यक्ष नागेश कुठारे यांच्या नेतृत्वात जेष्ठ नागरिकांसह एसटी विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर यांना निवेदन देऊन बस थांबवण्याची मागणी केली होती. या वेळी विभाग नियंत्रक क्षीरसागर यांनी सर्व जिल्ह्यातील आगारप्रमुख याना निर्देशित करून लांब पल्याच्या बस थांबवण्यात येतील असे आश्वासन दिले. या वेळी सिडको वाळूज महानगर एकमध्ये बसस्थानक असूनही तेथे बस येत नसल्याने त्याची पाहणी केली. उद्योग आयकॉन व तिरंगा चौक या ठिकाणी वस थांबवण्यासाठी जागेची पाहणी करण्यात आली. सिडको वाळूजमहानगर बचाव कृती समितीचे अध्यक्ष नागेश कुठारे, काकासाहेब बुट्टे, नरेंद्रसिंग यादव, सुदाम जाधव, जनार्दन रिंडे, लक्ष्मण काकडे, बाबुराव जसवंत, रावसाहेब गायकवाड, शरद ढवळे, सदाशिव सोनवणे, बोर्डे आदीची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!