July 23, 2024
Home » अपघाताचे भयानक दृश्य; ट्रॅक्टरचे दोन दुकडे; एक ठार एक गंभीर जखमी, एएस क्लब जवळील घटना

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा
वाळूज महानगर : लासुरकडून सांभारजिनगरकडे जातांना एएस क्लब ब्रिजजवळ ट्रॅक कारचा भयानक अपघात आज दि 19 रोजी दुपारी 3 वाजेच्या दरम्यान घडला. अपघात एवढा भयानक होता की, ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले तर कारचालकाचा जागीच मृत्यू झाला.

रोहिदास पाटीलबा उशीर वय 56 राय ठाकरे नगर एन 2, सांभाजीनगर असे मृत व्यक्तीचे नाव असून ट्रॅक्टर चालत गंभीर जखमी आहे. अधिक माहिती अशी की, लासूरकडून संभाजीनगरकडे ट्रैक्टर ( एम एच २०, जीइ १०८५) च्या पाठामागे कार ( एम एच २० सी एस ०५०४) भरधाव येत असतांना अचानक ट्रॅक्टर ट्रॉलीचे मागील दोन चाक निघाले, मागून येत असलेल्या कारची धडक बसून चालकाच्या डोक्यात ट्रॅक्टरमध्ये असलेला पत्रा घुसल्याने करा चालकाचा मृत्यू झाला, अपघात येवढा भयानक होता की, ट्रॅक्टरचे अक्षरशः दोन तुकडे झाले, घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिसांनी घटणास्थळी घाव घेत अडकलेल्या मृत कार चालकाला बाहेर काढून शासकीय रुग्णालयात दाखल केले. परिसरात बातमी पसरल्याने परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली.

——-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!