July 21, 2024
Home »  ‘आदर्श घोटाळ्या’प्रकरणी आज निघणार धडक मोर्चा;

इम्तियाज जलील करणार नेतृत्व

(न्युज मराठवाडा वृत्तसेवा)

औरंगाबादच्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत नियमबाह्य कर्ज वाटप करुन तब्बल 200 कोटी रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार लेखा परीक्षकांच्या अहवालानंतर समोर आला आहे. दरम्यान या प्रकरणी संचालक मंडळावर शहरातील सिडको पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आल्याने ठेवीदारांमध्ये खळबळ उडाली आहे. तर ठेवी परत मिळाव्यात आणि गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी ठेवीदार संघर्ष कृती समितीच्यावतीने आज (17 जुलै) रोजी सकाळी 11 वाजता पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. विशेष म्हणजे खासदार इम्तियाज जलील या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!