July 19, 2024
Home » खोटा नंबर टाकून चोरीची कार वापरणारा वाळूज वाहतूक पोलिसांच्या ताब्यात…

(न्युज मराठवाडा वृत्तसेवा) :वाळूज महानगर / प्रतिनिधी


चोरी झालेल्या मारुती स्विफ्ट कारवर बनावट नंबर टाकून ती वापरताना वाहतूक शाखेच्या तपासणीत उघड झाले. त्यामुळे त्यास जेरबंद करून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदरील कारवाई गुरुवारी दुपारी ए एस क्लब चौकात वाळुज वाहतूक शाखेने केली.


वाळुज वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक शंकर शिरसाट, पोलीस नाईक रंजक सोनवणे, सुधीर मोरे, सतिश हंबर्डे, पोलीस शिपाई अमोल जाधव हे गुरुवारी (ता.13) रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारासछत्रपती संभाजीनगर ते पुणे रोडवरील ए. एस. क्लब चौकात वाहतुक नियमन व वाहतुकीची कारवाई करीत असताना मारुती स्विफ्ट कार (एम एच 20,डीजे- 4239) हे वाहन ए. एस. क्लव चौकामध्ये आली असता तपासणीत ती बनावट नंबर टाकुन चालवीतांना डिव्हाईस मशीन मध्ये दिसले. या वाहनाचा मुळ क्रंमाक (एम एच 20,डीजे- 2033) असा निष्पण झाला. हे वाहन चालकाचे नाव कृष्णा रामजी पाटील वय 21 वर्षे व्यवसाय खा. नौकरी रा. दत्तनगर रांजणगाव वाळुज असे असून त्याच्याकडे कोणतेही कागदपत्र नाही. हे वाहन बनावट नंबर टाकुन फसवणुक करण्याचा उद्देशाने बनावटीकरण करुन चालवितांना मिळुन आला. या वाहनाबाबत खात्री केली असता ते 4 आक्टोंबर 2022 रोजी एम. वाळुज येथुन चोरीस गेल्याचे निष्पण झाले. त्याबाबत एम. वाळुज पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त मनोज लोहीया, पोलीस उपआयुक्त अपर्णा गिते, सहाययक पोलीस आयुक्त संपत शिंदे यांच्या मार्गदशनाखाली करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!