July 23, 2024
Home » आमच्या मुलीला त्रास का देतो म्हणत; नातेवाईकाकडून जावयाचा खून

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा :

वाळूज महानगर : पती पत्नीच्या भांडणातून झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यु झाल्याची घटना आंबेलोहळ येथे घडली आहे. ही घटना दि ९ जुलै रोजी घडली असून उपचारादरम्यान आज दि १३ जुलै ३१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. अनिल शालीन पिंपळे (३१), रा. आंबेलोहळ, ता गंगापूर, जि संभाजीनगर असे मृत तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
दि ९ जुलै रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पत्नी गिता पिंपळे व अनिल यांच्यात घरगुती वाद झाला होता त्यानंतर पत्नीने तिच्या आई वडीलांना सांगितले. त्यामुळे अनिलचे सासरे संजय लक्ष्म चव्हाण सासु पारुबाई संजय चव्हाण, मेव्हणा कृष्णा संजय चव्हाण व साडु करण भिमा पवार असे घरी आले व सासरे संजय चव्हाण व साडु करण भिमा पवार यांनी आमच्या मुलीला त्रास का देतो असे म्हणुन संजय चव्हाण व पारूबाई चव्हाण यांनी शिवीगाळ करुन मारहाण करु लागल्याने अनिल त्यांना मारहाण का करता असे विचारले असता मेव्हणा कृष्णा चव्हाण याने लाकडी दांड्याने डाव्या पायाचे गुडघ्या खाली मारल्याने माझे पायाचे हाड मोडले असून कृष्णा चव्हाण याने अनिलच्या दोन्ही हातावर लाकडी दांड्यानने मारहाण केली तसेच साडु करण भिमा पवार याने चाकुने डोक्यात व उजव्या पायाचे पोटरी खाली चाकुने मारुन जखमी केले तेव्हा अनिल जोरजोरात आरडाओरड केल्याने गावात राहणारे अफसर अकबर पटेल, सारंग काळे व अशोक उगले यांनी अनिलला त्यांचे पासुन सोडवुन उपचारासाठी घाटी दवाखाना येथे दाखल केले. उपचार सुरू असतांना दि १३ जुलै रोजी अनिल पिंपळेचा मृत्यू झाला असून सासरे संजय चव्हाण, सासु पारुबाई चव्हाण मेव्हणा कृष्णा चव्हाण तसेच साडू करण पवार यांच्यावर वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!