July 23, 2024
Home » ऑनलाईन गेमिंग महागणार…

गेमिंगवर आता 28% GST लागणार

न्युज मराठवाडा वृत्तसेवा

जीएसटी परिषदेच्या आज झालेल्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. ऑनलाईन गेमिंग, हॉर्स रेसिंग, आणि कॅसिनोवर 28 टक्के जीएसटी लागू होणार आहे.

जीएसटी कौन्सिलच्या 50 व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. जीएसटी कायद्यात सुधारणा केल्यानंतर हे नवीन कर लागू होणार आहेत.

जीएसटी कौन्सिलच्या बैठकीबाबत माहिती देताना अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सांगितले की, चार वस्तूंचे जीएसटी दर कमी करण्यात आले आहेत. फिश पेस्टवरील जीएसटी 18 टक्क्यांवरून 5 टक्के करण्यात आला आहे. जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत कर्करोगावरील औषधांच्या आयातीवरील जीएसटी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच विशेष औषधांसाठी औषध आणि अन्नावरील IGST ही रद्द करण्यात आला आहे. जीएसटी कौन्सिलच्या या निर्णयामुळे कॅन्सरवरील औषध Dintuvximab ची आयात स्वस्त होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!