July 26, 2024
Home » वाळूज परिसरातील महिलांच्या सुरक्षेसाठी आता स्वतंत्र दामिनी पथक…

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा
वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसी परिसरात महिला सुरक्षेसाठी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाणे अंतर्गत स्वतंत्र दामिनी पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकामधे एक पुरुष अनुभवी 3 महिला पोलीस अंमलदार असणार आहे.

वाळूज औद्योगिक परिसरात अनेक छोट्या मोठ्या कंपन्या असून देशभरातील नागरीक येथे कंपनीत कामानिमीत्ताने कामगार वास्तव्यास आहेत. तसेच गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाली असून या मध्ये महिला विषयी चे गुन्हे, तसेच मुली पळून जाण्याचे प्रमाणे आयुक्तालय हद्दीत सर्वात जास्तीचे आहे. औद्योगीक क्षेत्राची कामगार महिला सुरक्षा संदर्भान्वये कंपनीच्या शिफ्ट सुटल्यानंतर रोडवर महिलांची मोठ्या प्रमाणात संख्या असते. तसेच औद्योगिक परिसर असल्यामुळे महिला विषयी गुन्हे ज्यात छेड-छाड़ करणे, विनयभंग करणे असे महिला व मुलींविषयीक गुन्हयांचे मोठे प्रमाण आहे. तसेच महिलांसंदर्भातील मिसींग सुध्दा मोठ्या प्रमाणात दाखल होतात, वरील प्रमाणे महिला विषयीक गुन्ह्यांना आळा घाल्याण्यासाठी महिला अंमलदार यांची सतत पेट्रोलींग महिला सुरक्षा करणे गरजेचे असल्याने वाळूज भागास महिलांच्या सुरक्षीततेसाठी स्वतंत्र दामीणी पथक दामीनी पथक एक पुरुष अनुभवी 3 महिला पोलीस अंमलदार व एक चांगल्या स्थितीतील व सुसज्ज पोलीस वाहन असणार आहे दामिनी पथक हे दररोज सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत पोलीस ठाणे MIDC वाळूज व वाळूज पोलीस ठाणे हद्दीत कार्यन्वीत राहील. ज्या महिलांना आवश्यकता वेळी दामीण पथकास संपर्क साधणे असल्यास त्यांनी दुरध्वनि क्र. 0240-2240559, पो.स्टे. वाळूज 0240-2240560 यास किंवा डायल 112 ला कॉल करून मदत मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!