July 25, 2024
Home » अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोन वाटप

न्युज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज महानगर(अनिकेत घोडके)

तिसगाव येथे अंगणवाडी सेविकांना ऑनलाइन कामे करण्यासाठी अडचण येत असल्याने ग्रामपंचायतीतर्फे शुक्रवारी नऊ सेविकांना स्मार्टफोनचे वाटप करण्यात आले. महिला बालकल्याण विभागाच्या प्रकल्प संचालक छाया सोनकांबळे, पर्यवेक्षिका मीना पाटील, सरपंच शकुंतला कसुरे, उपसरपंच नागेश कुठारे यांच्या प्रमुख उपस्थितीत फोनचे वाटप करण्यात आले.

येथील अंगणवाडी सेविकांना अनेक योजनांची कामे ऑनलाइन करावी लागतात. मात्र त्यांच्याकडील फोन व्यवस्थित चालत नसल्याने बऱ्याच दिवसांपासून कामे खोळंबली होती. त्यामुळे ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन स्वनिधीतून नऊ अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोन उपलब्ध करून दिले. या वेळी ग्रामपंचायत सदस्य संजय जाधव, राजेश कसुरे, प्रवीण हांडे, नितीन जाधव, विष्णू जाधव, रेखा सूर्यवंशी, गोदावरी कोल्हे, संगीता अंभोरे, ईश्वरसिंग तरैय्यावाले आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!