July 22, 2024
Home » आषाढी एकादशीमुळे साताऱ्यात ३० जूनला बकरी ईद!; मुस्लिम बांधवांचा एकमुखी निर्णय

छत्रपती संभाजीनगर (न्युज मराठवाडा वृत्तसेवा) :

आषाढी एकादशी व बकरी ईद एकाच दिवशी येत असल्यामुळे सातारा भागातील मुस्लिम बांधवांनी एकादशीच्या दिवशी कुर्बानी न देता ३० जूनला कुर्बानी देऊन बकरी ईद साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. सातारा पोलीस ठाण्यात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. पोलीस निरिक्षक प्रशांत पोतदार यांनी ही माहिती दिली.


पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी आषाढी एकादशीच्या दिवशीच बकरी ईद असल्यामुळे मुस्लिम बांधवांनी बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी न देण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला पंढरपूरप्रमाणे साताऱ्यातील मुस्लिम बांधवांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. रविवारी (२५ जून) सायंकाळी घेतलेल्या बैठकीला साताऱ्याचे माजी सरपंच फेरोज पटेल, खाजा शरफोद्दीन मुल्ला, बाबा कुरेशी, फेरोज पटेल, जावेद शब्बीर पटेल, कविता वाघ, मेहराज पटेल, हकीम पटेल, पेश इमाम, , संभाजी गोरे, नंदकुमार भंडारे, हवालदार कारभारी नलावडे, सातदिवे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!