July 21, 2024
Home » वाळूज परीसरात शालेय साहित्यातून पालकांची आर्थिक लूट, शिक्षण विभागाचे दुर्लक्ष

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा
वाळूज महानगर ( संदीप लोखंडे ) :
महाराष्ट्र राज्य खाजगी शाळा, इंग्लिश मेडियम, सेमी मराठी आणि अनुदानीत शाळेनी यंदाच्या शैक्षणिक वर्षात शालेय साहित्याच्या माध्यमातून आर्थिक लूट करीत असल्याचे पालक वर्गाकडून बोलले जात आहे, याकडे शिक्षण विभागाने लक्ष देण्यासाठी पालकांनी शिक्षण विभागाला साकडे घातले आहे .दोन वर्ष संपून कोरोना आजाराने पालकांच्या खिशाला कातर लागलेली असताना , चालू शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला विद्यार्थी गणवेश, पुस्तके , बस दरवाढ, विविध प्रकाशनची महागडे गाईड, प्रात्यक्षिक नोंद वाह्या, बुट- मोजे, आणि वाजवी फिस वाढ करून कोरोना काळात बंद असलेल्या शाळेनी एकदम सगळा हिशोब चुकता करीत असल्याचे पालक वर्गात बोलले जात आहे .काही दिवसापूर्वी एका वृत्तवाहिनेनी गणवेशा संदर्भात मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याची कानउघडणी केलेली असताना देखील शिक्षण विभागाला जाग का? येत नाही, यातून वाळुजमहानगरातील सिडको वाळूज महानगर, बजाजनगर, रांजणगांव(शे.पू.) कमळापूर, जोगेश्वरी, वाळुज आदी भागातील पालकांची शालेय साहित्यातून होत असलेली छुपी लूट थांबवावी, नसता अगामी काळात जनआंदोलनांचा इशारा पालकांनी दिलेला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!