July 26, 2024
Home » वाळूज महानगरातील लाॅज पोलिसांच्या रडारवर !अवैध धंद्याना बसणार चाप

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा

वाळूज महानगर (संदीप लोखंडे ) : भर वसाहतीतील लाॅजिंगवर सुरू असलेल्या कुंटणखान्यावरील कारवाईमुळे बजाजनगरातील लाॅजचालकांचे धाबे दणाणले असून अवैध धंदे चालणारे लाॅज पोलिसांचा रडारवर आले आहेत. वेश्याव्यवसाय सुरू असलेल्या लाॅजिंगवरील कारवाईमुळे नागरिकांतून पोलिसांचे कौतुक होत असून एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सर्वच अवैध धंद्यांना आता चाप लागणार असल्याची चर्चा नागरिकांत आहे.
बजाजनगर भागातील जयभवानी चौकातील भरवस्तीत ओमसाई लाॅजवर

चार ते पाच महिलांकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात होता. त्या लाॅजवर गुरूवारी पोलिसांनी छापा मारून पिडीतांची सुटका केली. तसेच याप्रकरणी पोलिसांनी लाॅज चालक आप्पासाहेब महादेव खेडकर याच्यासह तिघांना अटक केली आहे. भरवस्तीत सुरू असलेल्या लाॅजिंगवरील वेश्याव्यवसायावर पोलिसांनी जी कारवाई केली. त्यामुळे एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे निरीक्षक अविनाश आघाव यांच्यासह पोलिस कर्मचार्यांचे बजाजनगरातील नागरिकांतून या कारवाईचे कौतुक होत आहे. तसेच परिसरातील अवैध धंद्यांनाही आता आळा बसणार असल्याची चर्चा नागरिकांत आहे.

सत्कार करणार्याला ही दाखवला कायद्याचा इंगा…
एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या निरीक्षकपदाचा चार्ज घेतल्यानंतर
ओमसाई लाॅजिंगचा चालक आप्पासाहेब खेडकर यांने पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांचा सत्कार केला होता. मात्र सत्कार करणारा खेडकर ला ही पोलिस निरीक्षक आघाव यांनी कायद्याचा इंगा दाखवल्याची चर्चा ही परिसरात सर्वत्र होत आहे.

——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!