July 22, 2024
Home » बजाजनगरात कुंटणखान्यावर छापा भरचौकातील लोकवस्तीतील लॉजिंगवर सुरू होता वेश्याव्यवसाय…

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा

वाळूज महानगर : भरचौकातील नागरी वसाहतीतील लाॅजिंगवर सुरू असलेल्या कुंटणखान्यावर गुरूवारी दि. १५ दुपारी एमआयडीसी वाळूज पोलिसांनी छापा टाकून लाॅजिंग मालकासह तीन दलालांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी ५१ हजार दोनशे रूपये रोखसह कंडोमची पाकीटे जप्त केली असून आजची लाॅजिंगवर केलेली ही कारवाई उद्योगनगरीतील पहिलीच कारवाई आहे. या कारवाईमुळे अनेक लाॅजिंगवाल्याचे धाबे दणाणले आहेत.

उद्योगनगरीतील बजाजनगर परिसरातील जयभवानी चौकालगत मोठ्याप्रमाणावर नागरी वसाहत आहे. याच भागात ओमसाई लाॅजिंग अ‍ॅण्ड रेस्टॉरंट आहे. नागरी वसाहतीतील या लाॅजिंगवर 4 ते 5 महिलांकडुन वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याची माहिती डायल ११२ या पोलिसांच्या नंबरवर मिळाली होती.

या माहितीवरून एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी ठाण्याचे दुय्यम निरीक्षक गणेश ताठे यांच्यासह एक पथक तयार केले. त्यानंतर ओमसाई लाॅजिंगवर बनावट ग्राहकाला पाठवले. त्यानंतर लाॅजिंगवरील दलाल योगेश भोजू जाधव याने एक हजार रूपये घेत बनावट ग्राहकाला लाॅजिंगच्या रूममध्ये सोडले. दरम्यान पंटरने इशारा केल्यानंतर दुय्यम पोलिस निरीक्षक गणेश ताठे, पो. काॅ. गणेश सागरे, अविनाश ढगे, पकंज साळवे, सुरेश भिसे, नितीन इनामे, सुरज अग्रवाल आणि महिला पोलिस प्रियंका तळवदे यांनी छापा टाकला. यावेळी लाॅजिंगच्या विविध चार रूममध्ये चार वेश्या असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यावरून पोलिसांनी लाॅजिंगवर आलेल्या अंबटशौकीन ग्राहक धरमसिंग महाजन जंघाळे (47, रा.पाच पीरवाडी ता. गंगापूर) याला अटक केली. त्याच्याकडून मोबाइलसह पोलिसांनी चारशे रूपये जप्त केले. याप्रकरणी पोलिसांनी लाॅजिंग चालक आप्पासाहेब महादेव खेडकर याला अटक करून त्यांच्या ताब्यातून 20 हजार पाचशे रूपये जप्त केले. तसेच व्यवस्थापक निळकंठ बाबासाहेब शिंगणे, (42, रा. बजाजनगर ) याच्याकडून 20 हजार चारशे रूपये जप्त करून अटक केली. याप्रकरणी पोलिस अंमलदार गणेश सागरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात लाॅजिंग चालक आप्पासाहेब खेडकर, व्यवस्थापक निळकंठ शिंगणे, ग्राहक धरमसिंग जंघाळे, दलाल योगेश जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!