July 23, 2024
Home » गर्भ लिंग निदान करणाऱ्या डॉक्टरसह नर्सवर कारवाई, दोघांना अटक

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा
वाळूज महानगर : वाळूजमध्ये पोलिस व वैद्यकीय अधिकारी यांनी सयुक्त सापळा रचून गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरसह नर्सवर कारवाई केली आहे. ही कारवाई दि २ जून रोजी करण्यात आली असून सुनील राजपूत रा. टीव्ही सेंटर छत्रपती संभाजीनगर व पूजा भालेराव रा सिल्लोड असे दोन्ही आरोपींचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक ०२/०६/२०२३ रोजी पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे वाळुज श्रीमती गिता बागवडे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, पोलीस ठाणे वाळुज हद्दीत एक डॉकेटर हा रोख रक्कम ५०००/- रुपये घेवुन कायद्याने बंदी असलेले गर्भलिंगनिदान करुन देत आहे. त्यावरुन पोलीस निरिक्षक गिता बागवडे यांनी वैद्यकीय अधिकारी उप जिल्हा रुग्णालय गंगापुर यांना सदर बाबत माहीती दिली. त्यानंतर पुढील कारवाईचा सापळा विषयी वैद्यकीय अधिकारी दोन पंच, एक डिकॉय गरोदर महिला व पोलीस स्टेशनचे विशेष पथक यांना माहीती देवुन सदर ठिकाणी रवाना झाले. सापळ्याप्रमाणे गरोदर महिलेने गर्भलिंगनिदान करणाऱ्या डॉक्टरशी संपर्क साधला. त्यानंतर काही वेळाने सदर डॉक्टर आला व डिकॉय महिलेस घेवुन एका खोलीत गेले व त्यांनी गर्भलिंगनिदान चाचणी सुरु केली. थोड्या वेळानंतर डिकॉय गरोदर महिलेने ठरल्याप्रमाणे बाहेर दबा धरुन सापळा पथकास हाताने इशारा केला असता सापळा पथक सदर ठिकाणी जावुन तेथे असलेला डॉक्टर यास गर्भलिंगनिदान चाचणी करताना रंगेहात पकडले. सदर डॉक्टर यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव सुनिल हरिचंद्र राजपुत वय ४४ वर्षे, रा. १३९/३९ टी.व्ही. सेंटर औरंगाबाद असे सांगितले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने कबुल केले की, मी ५०००/- रुपये घेवुन गरोदर महिलांच्या सोनोग्राफी करुन मुलगा आहे की मुलगी याचे निदान करतो. सदर डॉक्टरकडुन एक सोनोग्राफी करण्याचे मशिन, एक सॅमसंग कंबपनीचा मोबाईल फोन, गुन्ह्यात वापरलेली एक कार व औषधांचा साठा असे एकुण ११,६१,१०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ad.

सदरचा कारवाई पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस उप-आयुक्त दिपक गिऱ्हे, सहायक पोलीस आयुक्त अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीमती गिता बागवडे, पोलीस ठाणे वाळुज येथील विशेष पथकाचे पोलीस उप निरीक्षक संदिप शेवाळे, पोलीस अंमलदार आनंद वाहुळ, विजय पिंपळे, गजानन कसबेवाड, महीला पोलीस अंमलदार ज्योती सुर्यवंशी, फुड & ड्रम्सचे अधिकारी बळीराम डी. मरेवाड, डॉ. किसनराव धाये वैद्यकाय अधिकारी उप जिल्हा रुग्णालय गंगापुर, डॉ. गितेश चावडा वैद्यकाय अधिकारी उप जिल्हा रुग्णालय गंगापुर यांनी केली.

या प्रकरणी पोलीस ठाणे वाळुज येथे डॉ. किसनराव धाबे वैद्यकाय अधिकारी उप जिल्हा रुग्णालय गंगापुर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर १५३/२०२३ कलम २३,२५,३- (ब) गर्भधारणा पुर्व व प्रसव-पुर्व रोग निदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम १९९४ प्रमाणे रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सहायक पोलीस निरिक्षक एम.एम.सय्यद हे आहेत.

——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!