July 21, 2024
Home » तरुणावर दोघांकडून चाकुहल्ला; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा

वाळूज महानगर : जून्या वादातून एका २२ वर्षीय तरुणावर दोघांनी चाकूने हल्ला करत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना दिघी, काळेगाव ता. गंगापूर येथे मंगळवार (दिनांक ३०) रोजी रात्री ११:१५ वाजता येथील समाज मंदिराजवळ घडली आहे. ऋषिकेश उर्फ कुणाल प्रल्हाद गायकवाड (२२, रा. दिघी ता. गंगापूर) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर अजय विजय गायकवाड व नितीन मधुकर गायकवाड (रा. दिघी, ता. गंगापूर) असे आरोपींचे नाव आहे.

ऋषिकेश गायकवाड हा मंगळवारी रात्री सव्वा अकरा वाजता येथील समाज मंदिराच्या ओट्यावर बसलेला होता. त्याच ठिकाणी अजय गायकवाड व नितीन गायकवाड हे बसलेले होते. त्याचवेळी यांच्यामध्ये जुन्या भांडणाच्या कारणावरून वाद झाला. यावेळी अजय याने आता याला संपूनच टाकू असे म्हणाला खिशातून चाकू काढला तर नितीन गायकवाड यांनी ऋषिकेशला जोरात लाथ मारून खाली पाडले तसेच दोन्ही हात धरले. यावेळी अजय याने ऋषिकेशच्या छातीत बरगळीत, हातावर व तोंडावर चाकूचे वार करून त्याला गंभीरपणे जखमी केले. यावेळी आरडाओरडा झाल्याने वडील प्रल्हाद गायकवाड व भाऊ अमर हे धावत आले. त्यांनी ऋषिकेश यास जखमी अवस्थेत वाळूज पोलीस ठाण्यात आणले असता तेथे पोलिसांनी उपचारासाठी घाटी रुग्णालयात हलवले. याप्रकरणी ऋषिकेश याच्या फिर्यादीवरून दोघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पो. नि. गीता बागवडे यांच्या आदेशावरून सपोनि. अमोल ढोले हे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!