July 22, 2024
Home » कंपनीत काम करण्याच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा

वाळूज महानगर : वाळूज औद्योगिक परिसरातील कंपनीमध्ये काम करण्याच्या वादातून कामगाराला जबर मारहाण झाल्याची घटना दि ३१ मे रोजी घडली आहे. सुरेश कारभारी कायंदे वय ३०, रा एकतानगर, रांजणगाव (शेपू), ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर असे जखमी तरूणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरेश कारभारी कायंदे, वय 30, विशाल संजय कांबळे, वय 22, गुरुदेव रामलाल बडोदे, वय 28, उबेद कदिर शेख, वय 32, हे सर्व लक्ष्मी अग्री कंपोनंट अँड फोर्जिंग प्रा.लि., M 193, या कंपनीमध्ये काम करतात दि ३१ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास सुरेश कारभारी कायंदे व गुरुदेव रामलाल वडोदे यांच्यात काम करण्यावरुन भांडण सुरु झाले. तेव्हा गुरुदेव वडोदे याने सुरेश कायंदे यास शिवीगाळ करुन मारहाण करायला सुरुवात केली. तेव्हा उबेद कदिर शेख ऊर्फ बबू शेख हा आला. त्याने सुध्दा सुरेश कायंदे यास शिवीगाळ करुन मारहाण करायला सुरुवात करुन गुरुदेव वडोदे याने त्याचे बाजूस पडलेला लोखंडी रॉड हातात घेऊन सुरेश कायंदे यांचे डोक्यात पुढील व मागील बाजूस मारुन गंभीर जखमी करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे डोक्यातून रक्तश्राव होऊ लागला. सुरेश कायंदे हा खाली जमिनीवर पडला, जखमीला सुरेश खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले असून याप्रकरणी अनिकेत शेलार याच्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी गुरुदेव बडोदे व उबेर कदीर शेख यांना पोलिसांनी अटक केली असून कोर्टात हजर केले असता कोर्टाकडून ३ दिवसाचा पीसीआर देण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गौतम वावळेऊ हे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!