July 26, 2024
Home » बँकेकडून खातेदाराच्या दोन हजाराच्या नोटा घेण्यास नकार

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा
वाळूज महानगर : भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांची नोट चालनातून मागे घेण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला आहे. मात्र ३० सप्टेंबर पर्यंत चलनात राहतील असेही सांगितले आहे. तरीही काही बँका २ हजार रुपयांच्या नोटा घेत नसल्याचे चित्र वाळूज महानगर परिसरात पहावयास मिळत आहे. गुरुवारी (दि.२५) दुपारी खातेदार महावीर धुमाळे हे बजाजनगरातील राजर्षी शाहू मल्टिस्टेट को.ऑप.क्रेडीट सोसायटी म.बुलडाणा बँकेत पैसे जमा करण्यासाठी गेले होते. परंतू त्यांच्याकडील २ हजार रुपयांच्या नोटा जमा करून घेण्यास बँकेने नकार दिला. मात्र पत्रकार येताच खातेदारकडून सदरील नोटा जमा करून घेतल्या. बॅंकांच्या या मनमानी कारभारामुळे सर्वसामान्य नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे.

*adv.

भारतीय रिझर्व्ह बँकेने २ हजार रुपयांच्या नोटा ३० सप्टेंबर नंतर चलनात राहणार नाहीत असे जाहीर केले आहे. हा निर्णय जाहीर झाल्यापासून व्यवहारात २ हजारांच्या नोटा वाढल्या आहेत. बाजारात, पेट्रोलपंप आणि बँकेत तर २ हजाराच्या नोटांचे प्रमाण अधिकच वापरात येत असल्याचे दिसून येत आहे. मात्र काही ठिकाणी या नोटा घेण्यास नकार दिला जात आहे. व्यवहारात अचाad २००० च्या नोटा वाढल्याने सुटे पैसे देण्याचा प्रश्नही निर्माण झाला. रिझर्व्ह बँकेने या नोटा ३० सप्टेंबरपर्यं चलनात राहतील असे स्पष्ट सांगितले आहे. तरीही काही बँकांनी आत्तापासूनच या नोटा स्वीकारण्यास नकार घंटा सुरू केली आहे. वाळूज महानगरात काही बँकांमध्ये या नोटा घेतल्या जात आहेत. तर काही बँकांमध्ये मात्र घेतल्या जात नाहीत. विशेष म्हणजे बँकेचे खातेदार असूनही बँकेकडून या नोटा स्वीकारल्या जात नाहीत. बजाजनगरातील राजर्षी शाहू मल्टिस्टेट को.ऑप.क्रेडीट सोसायटी म. बुलडाणा या बँकेत भाजपा व्यापारी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष महावीर धुमाळे यांचे खाते आहे. गुरुवारी दुपारी ते आपल्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी बँकेत गेले होते. २ हजार रुपयांच्या ५ नोटा जमा करीत असताना बँक मॅनेजर विकास पाटील यांनी २ हजार रुपयाच्या नोटा घेऊ नये असे वरिष्ठांचे आदेश असल्याचे सांगत त्या नोटा घेण्यास स्पष्ट नकार दिला. तेव्हा धुमाळे यांनी मॅनेजरकडे लेखी मागितले. परंतू पाटील यांनी लेखी देण्यास नकार दिला.


याविषयी खातेदार महावीर धुमाळे यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी नेहमी प्रमाणे आपण बँकेत खात्यावर पैसे भरण्यासाठी गेलो. मात्र माझ्याकडे दोन हजाराच्या नोटा असल्याने त्या बँकेने जमा करून घेतल्या नाही. आपण या बाबतीत संबंधित मॅनेजर पाटील यांच्याशी बोललो. तेव्हा उद्धटपणे उत्तरे देण्यात आली. याविषयी रिझर्व्ह बँकेकडे तक्रार करणार आहोत, असे सांगितले. तर बँक मॅनेजर पाटील यांनी वरिष्ठांचे आदेश असल्याने आम्ही दोन हजाराच्या नोटा घेत नाही असे सांगितले.

पत्रकार आल्यानंतर बँकेने घेतल्या नोटा …

दरम्यान बजाजनगर मोहटादेवी चौकातील राजर्षी शाहू मल्टिस्टेट बँकेत २ हजाराच्या नोटा घेत नसल्याची माहिती मिळताच पत्रकार बँकेत गेले. पत्रकारांनी मॅनेजर पाटील यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करताच पाटील यांनी वरिष्ठांशी चर्चा करून खातेदार धुमाळे यांच्याकडील दोन हजार रुपयांच्या नोटा अखेर जमा करून घेतल्या.

——-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!