July 26, 2024
Home » २ हजाराची नोट बंद होणार; ३० सप्टेंबरपर्यंत बँकेत जमा करण्याची मुदत

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) २००० रूपयांच्या नोटा परत घेण्याचा निर्णय घेतला आहे. या नोटा बॅंकेत जमा करण्याची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत आहे. सध्या या नोटा व्यवहारात सुरूच राहणार आहेत. मात्र, ३० सप्टेंबरनंतर या नोटा बंद केल्या जातील. २०१६ मध्ये नोटबंदीनंतर २००० हजार रुपयांची नोट चलनात आली होती. त्यावेळी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या. लक्षणीय बाब म्हणजे आता २००० च्या नोटांची छपाई बंद होणार आहे. 

आरबीआयने सांगितले की, २३ मे पासून एकावेळी केवळ २० हजार रूपयांच्याच २ हजाराच्या नोटा बदलू किंवा जमा करू शकता. यासाठी बँकांना विशेष खिडकीची व्यवस्था करावी लागणार आहे.  याशिवाय आरबीआय नोटा बदलून घेण्यासाठी आणि जमा करण्यासाठी १९ शाखा उघडणार आहे. RBI ने प्रसिद्धीपत्रकात म्हटले की, २०१८-१९ मध्येच २००० रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!