July 21, 2024
Home » धक्कादायक!! राज्यातील 2200 मुली मार्चमध्ये बेपत्ता

गृहविभागाने तातडीने विशेष तपास पथक कार्यरत करावे.

राज्यात मार्च महिन्यात तब्बल 2 हजार 200 मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. म्हणजेच दिवसाला जवळपास 70 मुली बेपत्ता होत आहेत.

जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत बेपत्ता होणाऱ्या मुलींचे प्रमाण वाढलेलं पाहायला मिळत आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी याबाबत ट्विट करत गृहविभागाने या संपूर्ण प्रकरणी विशेष तपास पथक कार्यरत करावे अशी मागणी केली आहे.

जानेवारी ते मार्च या 3 महिन्यात 5 हजार 610 मुली बेपत्ता झाल्या आहेत. मार्च महिन्यात बेपत्ता होणाऱ्या मुलींच्या संख्येत 390 ने वाढ झाली आहे. गायब होणाऱ्या मुलींचे वय 18 ते 25 वर्ष आहे. प्रेम, लग्नाचे आमिष, नोकरी हे मुली बेपत्ता होत असल्याचे कारण असू शकते. मार्च महिन्यात पुण्यातून 2258, नाशिक मधून 161, कोल्हापूर 114, ठाणे 133, नगर 101, जळगाव 81 तर सांगलीतून 82 मुली बेपत्ता झाल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!