July 21, 2024
Home » पार्टीच्या बिलावरून वाद, हॉटेल चालकाने गिऱ्हाईकला संपवले

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा :

सिल्लोड : सिल्लोड तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, वाढदिवसाच्या पार्टीच्या बिलावरुन झालेला वाद तरुणाच्या जिवावर बेतला आहे. कारण बिलाच्या वादावरुन हॉटेल चालकाने कुकच्या मदतीने या तरुणाचा धारदार हत्याराने वार करुन खून केला आहे. शनिवारी (6 मे) रोजी सकाळी डोंगरगाव फाट्याजवळ ही घटना उघडकीस आली आहे.

दरम्यान, या खून प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी दोघांना अटक केली असून, त्यांनी गुह्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. संतोष जादुसिंग मनावत (वय 28 वर्षे, रा. वांजोळा) असे मयत तरुणाचे नाव आहे. तर संकेत अनिल जाधव (वय 21 वर्षे, रा. भीमनगर, भावसिंगपुरा छत्रपती संभाजीनगर ह. मु. स्नेहनगर सिल्लोड), गजानन यादवराव दणके (वय 24 वर्षे रा. चिंचोली नकीब ता. फुलंब्री) असे आरोपींचे नावे आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी डोंगरगाव फाट्याजवळील हॉटेल गारवा समोरील पाण्याच्या पाटात तरुणाचा मृतदेह काही नागरिकांना आढळून आला होतं. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी (5 मे) या तरुणाचा वाढदिवस होता. तर वाढदिवस साजरा करुन मित्रांसोबत हॉटेल समर येथे त्याने पार्टी केल्याची माहिती समोर आली. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या मित्रांना विश्वात घेत माहिती काढली. यात हॉटेल चालक व तरुणामध्ये बिलावरुन वाद झाल्याचे समोर आले. पोलिसांनी तत्काळ संबधित हॉटेल चालकाला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली. दरम्यान, हॉटेल चालकाने कुकच्या मदतीने या तरुणाचा धारदार हत्याराने वार करुन खून केल्याचे समोर आले. तर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे तरुणाचा भाऊ गोवर्धन जादुसिंह मनावत यांनी दिलेल्या तक्रारीवरुन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
………………………………………………………..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!