July 26, 2024
Home » पोलिस उपनिरीक्षकाच्या कारला कंटेनरने फरफटत नेले; वाळूज येथील घटना 

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा 

वाळूज महानगर : रजेवरुण कर्तव्यावर हजर होण्यासाठी निघालेल्या पोलिस उपनिरीक्षकाच्या गाडीला भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने पाठीमागून धडक देऊन लांब फटपट नेल्याची घटना वाळूज पोलिस ठाणे हद्दीतील इसारवाडी फाटा येथे घडली आहे. ही घटना आज दि 5 रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली असून वाळूज पोलिस ठाणे येथे कंटेनर चलकविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

लक्ष्मण एकनाथ काकडे, वय 36 रा धानोरा पोस्ट भराडी ता सिल्लोड जि छत्रपती संभाजीनगर, हे मुंबई येथील खार पोलिस ठाणे येथे पोलिस उपनिरीक्षक कर्तव्यास आहे, काकडे हे आठ दिवासपूर्वी रजेवर आपल्या गावी आले होते, आज दि 5 रोजी कर्तव्यावर रुजू होण्यासाठी कुटुंबासह एमएच 04 जीएम0620 कारने मूंबई येथे जात असतांना छत्रपती सांभाजीनगर – नगर रस्त्यामधील इसारवाडी फटाजवळ येताच पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या एमएच12क्युजी 1994 कंटेनर ने पाठीमागून जोरात धडक देऊन काकडे याच्या कारला लांब फरफटत नेले, त्यामुळे कारचे मोठे प्रमाणात नुकसान झाले याप्रकरणी कंटेनर चालक जापाडी हिरालाल राठोड रा तुळजापूर, वाळूज, छत्रपती सांभाजीनार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस आमलदार सुखदेव भागडे हे करीत आहे.    

——–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!