July 18, 2024
Home » वाळूज परिसरातील कोम्बिंग ऑपरेशनमध्ये १४ जणांना अटक

न्यूज मराठवाडा

वाळूज महानगर : एमआयडीसी वाळूज पोलिसांनी बुधवारी (दि.३) रात्री कोम्बिंग ऑपरेशन करत १४ गुन्हेगारांना अटक केली. या मोहिमेमुळे गुंड व गुन्हेगारी कारवायात सहभागी होणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.

कोम्बिंगमध्ये ज्ञानेश्वर बापुराव वडजे (रा. रांजणगाव) याच्याकडून तीक्ष्ण हत्यार जप्त केले असून त्यांच्याविरुद्ध भारतीय शस्त्रास्त्र कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या मोहिमेत रात्री उशिरापर्यंत व्यवसाय सुरु ठेवणाऱ्या तीसगाव चौफुलीवर माऊली हॉटेल, बजाजनगरातील मयुर ज्यूस सेंटर, अमृततुल्य चहा व सह्याद्री हॉटेल या चार व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. यात हद्दपार आदेशाचे उल्लंघन करुन फिरणाऱ्या गणेश दिलीप पिंपळे (रा. टोकी), सुदाम रावसाहेब काजळे (रा.जोगेश्वरी), रवी कचरु मुकुटमल (रा. वडगाव), अवैधरित्या दारुची विक्री करणारे संतोष रणयेवले (रा. रांजणगाव), विरेंद्रकुमार श्रीराम बापु ( रा. जोगेश्वरी), अजय प्रकाश चव्हाण (रा. रांजणगाव), राजु शेषराव धोत्रे (रा. रांजणगाव ) तसेच जामिनाव सुटुन फरार झालेल्या चंद्रकांत बाळू बन्सोडे, संजय बाळू बन्सोडे, स्वप्निल सुभाष पवार, एकनाथ विनायक शिरसाट (सर्व रा. जोगेश्वरी), सोमनाथ फकीरचंद राजमल व संजय गणेश बिसरे (दोघेही रा. तीसगाव) या १४ गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या गुन्हेगारांना पोलीस पथकाने पकडले.
………………………………………………………..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!