July 21, 2024
Home » बडवे इंजीनियरिंगला भीषण आग; घटनास्थळी अग्निशमन दल दाखल

 वाळूज महानगर : छत्रपती संभाजीनगरमधील एका कंपनीला भीषण आग लागली आहे. छत्रपती संभाजीनगर-पैठण रोडवरून काही अंतरावर असलेल्या बडवे इंजीनियरिंग कंपनीला संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झालं असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. तसेच आतापर्यंत घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या दाखल झाल्या असून,10 पेक्षा अधिक पाण्याचे टँकर देखील बोलवण्यात आले आहे. मात्र दोन तासांपेक्षा अधिक काळ उलटून देखील आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवता आले नाही. विशेष म्हणजे आग लागल्यावर याबाबत कंपनीकडून पोलिसांना कोणतेही माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे घटनास्थळी मोठा गोंधळाचं वातावरण पाहायला मिळाले.

छत्रपती संभाजीनगर-पैठण रोडपासून काही अंतरावर असलेल्या नायगाव खंडेवाडी शिवारात असलेल्या बडवे इंजीनियरिंग कंपनीला संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. पाहता पाहता आग अचानक भडकली आणि आगीचे प्रमाण अधिकच वाढले. त्यामुळे आकाशात  धुराचे लोट पाहायला मिळाले. त्यामुळे आगीची माहिती तात्काळ अग्निशमन दलाला देण्यात आली. सुरुवातीला एका अग्निशामक दलाच्या बंबाने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र आग मोठी असल्याने आणखी चार अग्निशमक दलाच्या गाड्या पाचारण करण्यात आले. मात्र तब्बल दोन तास उलटून ही अजूनही आगीवर नियंत्रण मिळवण्यात पूर्णपणे यश मिळाले नाही. 

पोलिसांना माहितीच दिली नाही…

बडवे कंपनीला संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास आग लागली. आग मोठ्याप्रमाणात असल्याने अग्निशामक दलाला माहिती देण्यात आली. मात्र संबंधित स्थानिक पोलिसांना याबाबत कंपनीकडून कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. तब्बल दोन तासांनी माध्यम प्रतिनिधींनी विचारणा केल्यावर पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. त्यामुळे कंपनीच्या या बभूमिकेबद्दल वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलाय.

घटनास्थळी खाजगी टँकर

छत्रपती संभाजीनगर पैठणरोड पासून काही अंतरावर असलेल्या बडवे कंपनीला लागलेल्या आगीचे प्रमाण मोठ्याप्रमाणात होतं. अग्निशमन दलाला बोलूनही आग नियंत्रणात येत नव्हती. त्यामुळे परिसरातील खाजगी टँकर देखील घटनास्थळी बोलवण्यात आले. आतापर्यंत दहापेक्षा अधिक खाजगी टॅंकरने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. पण आगीचं प्रमाण जास्त असल्याने आग अजूनही नियंत्रणात आली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!