July 23, 2024
Home » सिडको वाळुजमहानगरातील पाणीप्रश्न लवकर सोडवा…

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा

वाळूज महानगर : सिडको वाळूजमहानगर प्रकल्पाच्या दैनंदिन पाणीपुरवठ्याच्या समस्येबाबत सिडकोचे मा.कार्यकारी आभियंता कपिल राजपुत तसेच पाणीपुरवठा सहाय्यक आभियंता यांची सिडको कार्यालय, वाळूजमहानगर-१ तिसगाव छत्रपती संभाजीनगर येथे दि 3 मे रोजी बैठक झाली. या बैठकीत सिडको वाळूजमहानगर बचाव कृती समिती चे अध्यक्ष तथा तिसगाव चे उपसरपंच नागेश कुठारे यांच्या शिष्टमंडळ व सिडको अधिकारी यांनी पाणीपुरवठ्याच्या समस्येवर चर्चा करण्यात आली.

सिडको वाळूजमहानगर प्रकल्पाच्या दैनंदिन पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक निश्चित करून त्यामध्ये सुसूत्रता आणणे व त्याची अंमलबजावणी करणे बाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सुरूवातीलाच दि.२३ एप्रिल २०२१ सिडको प्रशासन पत्र देऊन सुरूळीत पाणी पुरवठा करण्यासाठी लोकसंख्येच्या तुलनेत ५ एमएलडी पाणी पुरवठा कमी असुन सिडको वाळूजमहानगर प्रकल्प अस्तित्वात आल्यापासून ५ एमएलडी च्या कोट्यात वाढ झाली नसुन या बाबत सिडको ने एमआयडीसीकडे मागणी करावी आशी बैठक घेऊन मागणी केली होती.मात्र आज रोजी वाळूजमहानगर प्रकल्पची लोकसंख्येत वाढ होऊन ती जवळपास ६५ हजार झाली असुन या तुलनेत जवळपास १० एमएलडी अवश्यक पाण्याचा प्रमाण असुन आज रोजी सिडको कडे फक्त ५ एमएलडी मध्येच पाणी पुरवठा करत आहेत खुप अत्यल्प असुन या मध्ये वाढ होणे गरजेचे आहे आशी मागणी केली या अनुषंगाने कार्यकारी आभियंता यांनी या बाबत बोलत असताना सिडको वाळूजमहानगर १ येथे नविन टाकीची उभारण्यात येणार असुन या आठवड्यात नविन वेळा पत्रक जाहीर करून पाण्याचा वेळा निश्चित करण्यात येतिल असे आश्वासन उपस्थित शिष्टमंडळास कार्यकारी आभियंता यांनी दिले. या बैठकीस समितीचे अध्यक्ष तथा तिसगाव चे उपसरपंच नागेश कुठारे,उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य काकासाहेब बुट्टे, उपाध्यक्ष नरेंद्रसिंग यादव, ज्ञानेश्वर म्हस्के,पि एस गुजर तसेच आश्विनी बनसोडे हे उपस्थित होते.

पाठपुरावा करून पाण्याची मागणी लवकरच करणार- कुठारे

सिडको वाळुजमहानगर प्रकल्प अंतर्गत मोठ्या संख्येत नागरी वसाहत वाढ झाली असुन ती जवळपास ६५ हजार आहे. या तुलनेत पाणी अर्धेच मिळत आहे या बाबत आम्ही लवकरच शासन स्तरावर पाठपुरावा करून नागरी वसाहतीस प्राधान्य देऊन पाण्याची मागणी लवकरच करणार आहोत – नागेश कुठारे (उपसरपंच तिसगाव )

—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!