July 22, 2024
Home » केवळ ११ महिन्यात मनपा आयुक्तांची बदली, जी.श्रीकांत नवे आयुक्त

छत्रपती संभाजीनगर : गेल्या आठवड्यात झालेल्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यानंतर आता राज्य सरकारने आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश काढले आहे. छत्रपती संभाजीनगरचे महानगरपालिका आयुक्त अभिजीत चौधरी यांच्यासह राज्यातील एकूण 10 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगरच्या जीएसटी कार्यालयात कार्यरत असलेले जीएसटी सहआयुक्त जी श्रीकांत यांची संभाजीनगर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी छत्रपती संभाजीनगर मनपा आयुक्त अभिजीत चौधरी यांची बदली झाली आहे. सोबतच राज्यातील इतर नऊ आयएएस अधिकाऱ्यांच्या देखील बदल्या करण्यात आले आहे.

गेल्या आठवड्यात सरकारने राज्यातील 30 पेक्षा अधिक आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यानंतर आता आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश निघाला आहे. ज्यात राज्यातील एकूण 10 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आले आहे. विशेष म्हणजे धडाकेबाज अधिकारी समजल्या जाणाऱ्या तुकाराम मुंडे यांची देखील मंत्रालयात बदली करण्यात आली आहे.        

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!