July 22, 2024
Home » जुन्या वादातून फिल्मी स्टाईल मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल …

न्यूज मसराठवा वृत्तसेवा

वाळूज महानगर : जुन्या वादातून फिल्मी स्टाईल मारहाण झाल्याची घटना साई रेसिडेन्सी (सिडको वाळूज महानगर १) सोसायटीमध्ये दि १ मे रोजी दुपारी घडली. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये वैभव शिंदे यांच्या फिर्यादीवरून तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

विनीत, विक्की नारळे, बंटी उबाळे असे तिन्ही आरोपींचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १४ एप्रिल रोजी फिर्यादी व आरोपी यांच्यात वाद झाला, याप्रकरणी गुन्हाही दाखल झाला होता, परंतु त्या जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी सोसायटीमधे घुसून वैभव शिंदे याला शिवीगाळ करुन हाताचापटाने मारहाण करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक अशोक जाधव हे करीत आहे.

——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!