July 23, 2024
Home » अखेर पवारांनी भाकरी पलटवली…?

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा

मुंबई, दि. २ – राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज, २ मे रोजी मोठी घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला असल्याची मोठी घोषणा शरद पवार यांनी आज केली. दरम्यान, सभागृहातच ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या निवृत्तीला प्रचंड विरोध झाला. कोणतीही चर्चा न करता अचानक राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यपदावरून निवृत्त होण्याच्या निर्णयामुळे सभागृहातील वरिष्ठ नेत्यांना अश्रु अनावर झाले. ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात ज्येष्ठ नेते शरद पवारांनी ही घोषणा केल्याने राजकीय गोटात मोठी खळबळ उडाली आहे. कोणतीही चर्चा न करता अचानक हा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमधून प्रचंड विरोध झाला. शरद पवारांनी फेरविचार करावा, असा सूर यावेळी सर्वांचा होता.

——-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!