July 23, 2024
Home » महिलांनो सावधान ! व्यवसायिक बोर्डावरील नंबर घेऊन अश्लील बोलणाऱ्या तरुणाला अटक

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा

वाळूज महानगर : ब्युटी पार्लरसह महिलांसाठी गरजू वस्तूचा व्यवसाय करणार्या व्यवसायिक बोर्डावरील महिलांचे मोबाईल नंबर घेऊन फोन करून महिलांना अश्लील बोलून त्रास देणार्याला एमआयडीसी वाळूज पोलिसांनी शनिवारी दि. २९ रात्री अटक केली. वाळूज भागातील सिडको महानगरातील एका मैदानावर एक महिला अमोल पवार (वय २५ रा. सिडको महानगर) या तरूणाला जाब विचारत असल्याचे त्या मैदानावर रनिंग करणार्या एका तरूणाने पाहिले. त्यानंतर त्या महिलेला काय झाले म्हणून विचारपूस केली. त्यावेळी हा तरूण गेल्या चार महिन्यांपासून मोबाईलवर काॅल करून अश्लील बोलून त्रास देत असल्याचे सांगितले. ही बाब रनिंग करणार्या तरूणाने घरी सांगितली.

त्यानंतर त्या तरूणाच्या बहिणेने तो तरूण त्या महिलेला कोणत्या नंबरवरून काॅल करत होता. तो नंबर आणि त्या तरूणीला येणार्या मोबाईलचा नंबर तपासला. तो मोबाईल नंबर सारखाच होता.दरम्यान त्याच दिवशी सांयकाळी अमोल पवार हा त्या तरूणीच्या दुकानासमोरून चकरा मारत होता. त्यावेळी त्या महिलेने अमोल पवारच्या व्हाट्स अॅप डिपीवरील चेहर्याचे निरिक्षण केले. त्यावरुन अमोल हाच आपल्यालाही मोबाईलवर काॅल करून अश्लील बोलत असल्याचे त्या महिलेच्या निर्दशनास आले. त्यावरून महिलेने तिच्या भावाला दुकानावर बोलवून घेत ११२ नंबर फोन करून पोलिसांना माहिती दिली. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहचले. त्यानंतर अमोल पवार याला एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात आणून विचारपूस केली. पोलिस तपासात अमोल पवार याने गुन्हा केल्याची कबूली दिली. दरम्यान महिलेने दिलेल्या तक्रारीवरून अमोल पवार याच्याविरुध्द गुन्हा करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धनराज राठोड हे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!