July 26, 2024
Home » सिडको अनधिकृत अतिक्रमण हटवतांना गोंधळ; चार जणांविरोधात गुन्हा दाखल

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा

सिडको वाळूज महानगरातील गट ११८ पी मध्ये सिडको प्रशासनाकडून अनधिकृत अतिक्रमण हटवण्याचे काम सुरू असतांना त्याला विरोध करणाऱ्या एका महिलेसह चार जणांविरोधात दि २७ एप्रिल रोजी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
सिडको मालमत्ता अधिकारी अस्मिता वीरशिद यांनी २७ एप्रिल रोजी दुपारी हर्षवर्धन साळवे, माधव सुर्यवंशी सव्हेयर, रोहीणी सातपुते, सुभाष मगरे, गजानन गवळी, राजु शिंदे, ताराबाई भिसे, पुष्पा पवार, अरुणा सुरडकर, मच्छिंद्र लोखंडे यांच्यासह अनधिकृत बांधकामच्या ठिकाणी जाऊन अतिक्रमण काढत असतांना अचानकपणे जयभद्रा ट्रेडर्स मधील एका मुलाने त्याच्या दुकानात असलेले साहित्य, कागदी खोके, पुठ्ठे दुकानासमोर आणुन जाळुन टाकले व जोरजोराने आरडाओरडा करुन कारवाई बद्दल रोष व्यक्त केला. यामुळे जमलेल्या नागरिकांचा रोष वाढल्याने बराच गोंधळ निर्माण झाला त्यावेळी तेथुन सिडको अधिकारी कर्मचारी अतिक्रमण कारवाई बंद करुन पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी एका महिलेसह माणीक शिंदे, अशोक गावंडे, दत्तात्रय वर्षे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस आमलदार तारव हे करीत आहे.

माझ्यावर खोटा गुन्हा केला…
दत्ता वर्पे यांनी या अगोदर प्रलंबित विकासकामे व सोयी सुविधांसाठी प्रशासनाच्या विरोधात बेमुदत उपोषण सुरु केले होते उपोषणाला चांगलाच प्रतिसाद मिळाला होता त्याचा राग मनात ठेवत माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचे वर्पे यांनी म्हटले आहे.

——-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!