July 18, 2024
Home » महिलेच्या गळ्यातील सव्वातोळ्याचे गंठन हिस्कवून चोरटे पसार; बजाजनगरातील घटना…

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा

वाळूज महानगर : घराकडे पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील सव्वातोळ्याचे मिनी गंठन चोरट्यांनी हिसकावल्याची घटना बजाजनगर येथील स्वामी समर्थ मंदिरासमोर आज दि २६ एप्रिल रोजी सायंकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास घडली.

स्वाती आनंद कुलकर्णी (२६) रा. एक्स ११०, स्वामी समर्थ मंदिरासमोर असे महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार स्वाती कुलकर्णी व सोनाली पांडे या दोन महिला स्वामी समर्थ मंदिराकडे पायी जात असतांना समोरून दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी स्वाती कुलकर्णी यांच्या गळ्यातील सव्वा तोळ्याचे मिनी गंठन हिसकावून घुम ठोकली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घटनेची माहिती घेतली. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!