July 22, 2024
Home » गट नंबर मधील उद्योजकांचा विजेचा प्रश्न मार्गी – महावितरण कडून नवीन वीज पुरवठ्याच्या कामाला प्रारंभ

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा
वाळूज महानगर : करोडी-साजापूर परिसरातील गट नंबर मध्ये जवळपास सातशे ते आठशे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग युनिट सुरू आहे.मात्र या उद्योजकांना महावितरण प्रशासनाकडून अनियमित विज पुरवठा करण्यात येत असल्याने येथील उद्योग संकटात सापडले होते. त्यामुळे येथील उद्योजकांना अखंडित विष पुरवठा सुरू करावा.अशी मागणी उद्योजकांच्या वतीने मसीया संघटना तसेच उद्योजक अर्जुन आदमाने, सुरेश फुलारे, गणेश कोलते,भारत फुलारे, मुबारक शेख, प्रकाश पाटील,ज्ञानेश्वर चव्हाण आदींच्या वतीने महावितरण प्रशासनाकडे करण्यात आली होती. महावितरण प्रशासनाने करोडी साजापूर गट नंबर मधील उद्योजकांसाठी 10 मेगावॅट अधिकचा वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.या कामाचा शुभारंभ आज मंगळवार 25 एप्रिल रोजी कार्यकारी अभियंता ढाकणे व उपकार्यकारी अभियंता प्रशांत तोडकर यांच्या हस्ते व उद्योजक अर्जुन आदमाने, माजी उपसरपंच विष्णू जाधव उद्योजकांच्या उपस्थितीत करण्यात आला. त्यामुळे लवकरच गट नंबर मधील उद्योजकांना अखंडित वीज पुरवठा सुरळीत होणार असल्याने उद्योजक वर्गाकडून महावितरणच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.

करोडी साजापूर शिवारात लहान मोठ्या जवळपास 700 ते 800 कंपन्यांचे युनिट सुरू आहे. यापैकी अनेक कंपन्या ह्या बजाज,इंदुरान्स, वेरॅक आधी कंपन्यांना मटरेल सप्लाय करतात. यापैकी अनेक उद्योजकांनी बँकेकडून लोन काढून आपले व्यवसाय सुरू केले आहे.मात्र या परिसरात सतत वीज पुरवठा खंडित होत असल्याने अनेकदा उत्पादन बंद राहते.त्यामुळे उद्योजकांना आपल्या ऑर्डर वेळेवर पूर्ण करण्यासाठी अडचणी निर्माण होतात. काम असतानाही विजे अभावी मशीन बंद राहात असल्याने उद्योजकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.त्यामुळे महावितरण प्रशासनाने तात्काळ येथील उद्योजकांना नियमित वीजपुरवठा सुरू करावा.अशी मागणी अशी मागणी मसीया संघटना तसेच परिसरातील उद्योजक अर्जुन आदमाने व त्यांच्या सहकार्याकडून वारंवार कार्यकारी अभियंता यांच्याकडे करण्यात येत होती.मात्र महावितरण प्रशासन याकडे दुर्लक्ष करत होते.अखेर या वृत्ताची दखल घेऊन महावितरण प्रशासनाने करोडी साजापूर शिवारातील उद्योजकांना 10 मेगावॅट अतिरिक्त वीज पुरवठा देण्यासाठी पुढाकार घेत प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्याने उद्योजकांनी समाधान व्यक्त केले.
करोडे साजापूर गट नंबर मधील उद्योजकांना सुरळीत विद्युत पुरवठा मिळावा याकरिता सिडको वाळूज महानगर मधील विद्युत जोडणी गोलवाडी येथील सब स्टेशनला करण्यात येणार आहे. त्यामुळे सिडको महानगर मधील शिल्लक 10 मेगावॅट वीज गट नंबर मधील उद्योजकांना देण्यात येणार आहे.त्यासाठी आज प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली.एक महिन्याच्या आत गट नंबर मधील उद्योजकांना एमआयडीसीचा विद्युत पुरवठा सुरू होईल- विष्णू ढाकणे कार्यकारी अभियंता यावेळी उपकार्यकारी अभियंता प्रशांत तोडकर सहाय्यक अभियंता सचिन उखंडे उद्योजक अर्जुन आदमाने, माजी उपसरपंच विष्णू जाधव प्रवीण हांडे हरी शिव मगर दुष्यंत आठवले आदींची उपस्थिती होती.

——-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!