July 23, 2024
Home » दानवेंकडून एजंटच्या नावासहित यादी जाहीर, छत्रपती संभाजीनगरात खळबळ; हफ्ते व्यवसुलीचा पोलिसांवर गंभीर आरोप

न्यूज मराठवाडा

छत्रपती संभाजीननगर शहर पोलिसांकडून अवैध धंदे चालू देण्यासाठी हप्ते वसुली करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दोन दिवसांपूर्वी बोलताना केला होता. दरम्यान आज पत्रकार परिषद घेऊन दानवे यांनी संपूर्ण हप्ते वसुलीची यादीच माध्यमांसमोर जाहीर केली आहे.

कोणत्या गोष्टीसाठी कोण किती रुपयांची हप्ते वसुली करतो अशा एजंटच्या नावासहित यादी दानवे यांनी जाहीर केली आहे. त्यांच्या या आरोपाने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. तर महिन्याला 60 लाख ते 80 लाख रुपये संभाजीनगर शहर पोलीस जमा करत असल्याचा आरोपही दानवे यांनी केला आहे. त्यामुळे यावर पोलिसांची आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काय प्रतिक्रिया असणार आहे हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!