July 22, 2024
Home » क्रांतीसूर्य महात्मा फुले यांची जयंती बजाजनगरात उत्साहात संपन्न

वाळूज महानगर; न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : क्रांतीसूर्य महात्मा फुले जयंती निमित्त बजाजनगरात विविध संघटना, पक्ष, संस्था, महाविद्यालय, शाळेच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.


जयंती निमित्त सर्वप्रथम इंद्रप्रस्थ कॉलनीतील हनुमान मंदिरापासुन स्व. भैरोमल तनवानी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली. याप्रभात फेरीत विद्यार्थ्यांनी क्रांतीसूर्य महात्मा फुले यांचा विजय असो., जय ज्योती….. जय क्रांती अशा विविध घोषणा देऊन परिसरात चैतन्य निर्माण केले.ही फेरी जय भवानी चौक, विठ्ठल मंदिर त्रिमूर्ती चौक, गणपती मंदिर, छत्रपती नगर मार्गे आमदार संजय शिरसाठ यांच्या स्वखर्चातून बसविण्यात आलेली क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णांकृती पुतळ्याना अभिवादन करून समारोप करण्यात आला.


या प्रभात फेरीत रांजनगाव येथील राजमाता जिजामाता विद्यालयाच्या वतीने झान्ज पथक व लेझिम पथकाने सादर केलेले विविध प्रात्यक्षिक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते.
काही महिलानी लाठीकाठीचे प्रात्यक्षिक ही सादर केले. प्रभात फेरीमध्ये सामील झालेल्या महिला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सारखी वेशभूषा करून सामील झाल्या होत्या. ढोल पथकातही महिला व मुलींनी सहभाग घेतला. या वेळी उत्सवसमितीचे अध्यक्ष अविनाश सोनटक्के,उपाध्यक्ष जयप्रकाश सारंग,सचिव रुपेश कुदळे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर डाके,विशाल लगड, कोषाध्यक्ष कुमार बिरदवडे,चक्रधर डाके, संघटक भिलाभाऊ आहिरे,
आकाश जाधव प्रसिद्ध प्रमुख प्रदीप माळी, ज्ञानेश्वर डाके,
गणेश पवार, टी. के. शिंदे, स्वप्नील माळी, जालिंदर लगड,
ईश्वर उमाळे, प्रवीण नांगरे,अमोल चव्हाण,मुकुंद तेलप, मिलिंद भालेराव, दिगंबर क्षीरसागर, पुंडलिक पवार, ज्ञानेश्वर जाधव, मारुती शिंदे,देविदास भुक्कन प्रमुख उपस्थिती सरपंच सुनील काळे हनुमान भोंडवे,बाळासाहेब गायकवाड, दशरथ मुळे, अनिलभैया चोरडिया,अशोक लगड,नितीन देशमुख, डॉ.संजय सांभाळकर,राजन सोमसे,प्रकाश निकम, लिलाधर रोकडे, अंकुश पुंड, किसनराव शिंदे, पोपटराव रसाळ,वैशाली अवघडे, रमाताई उबाळे, साधना म्हस्के, सुनंदाताई कुदळे, ग्रामपंचायत सदस्य माधुरीताई सोमासे, ग्रामपंचायत सदस्य सुरेखाताई लगड, सुरेखा शिंदे, ताराबाई शिंदे,वैशालीताई अवघडे, प्रितीताई देवकर, मयुरी सोनटक्के, वर्षा लगड, शिवाजी गोरे, नाना जगताप, संतोष चौधरी, शेखर खैरे, सिद्धार्थ पैठने,काकासाहेब गायकवाड, मारोती शिंदे, माऊली गोल्हार,संतोष उगले आदी उपस्थित होते

https://news-marathwada.com/2023/04/11/11-04-2023/

——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!