July 23, 2024
Home » उकळते पाणी अंगावर पडल्याने चिमुकलीचा मृत्यू;परिसरात हळहळ

गंगापूर ; न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगर येथून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. उकळलेले पाणी अंगावर पडून जखमी झालेल्या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

गंगापूर तालुक्यातील पुरी येथील प्रतिभा खंडागळे असे मृत्यू झालेल्या सात वर्षीय चिमुकलीचे नाव आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी ही चिमुकली घरात झोपलेली होती. याचवेळी तिची आई शेगडीवर उकळलेले कडक पाणी खाली घेत असताना अचानक कडक पाणी तिच्या अंगावर पडल्याने ती गंभीर जखमी झाली होती.

तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्यावर उपचार करून तिला रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती, मात्र पुन्हा त्रास सुरू झाल्याने तिला घाटीत दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेमुळे खंडागळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.


Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

Huren Slowakei – Erotische Schönheiten

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!