July 21, 2024
Home » खासदार गिरीश बापट यांचं निधन

पुण्यातील भाजप नेते खासदार गिरीश बापट यांचे आज पुण्यात निधन झाले. शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७२ वर्षांचे होते.

खासदार गिरीश बापट यांचे निधन झाल्याची माहिती भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून बापट आजारी होते. दरम्यान गिरीष बापट यांच्या पश्चात कुटुंबात एक मुलगा आणि पत्नी आहेत.

गिरीश बापट हे १.५ वर्ष रुग्णालयात दाखल होते, आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. गिरीश बापट यांच्या पार्थिवावर अंत्यविधी ७ वाजता वैकुंठ स्मशान भूमीत होणार आहेत.

पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघात किंगमेकर अशी ओळख असणारे गिरीश बापट यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीत संघ स्वयंसेवक, कामगार नेता, नगरसेवक, आमदार आणि खासदार अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!