July 23, 2024
Home » सत्येंद्र महादेव मंदिराची स्थापना उत्साहात

प्रथम महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज यांच्या हस्ते महादेवाच्या पिंडीची व नंदीची पूजा


वाळुज महानगर (दि.29)

सिडको वाळूज महानगर 1 येथील साई रेजेन्सी सोसाटीमध्ये विधीवत पूजा पाठ व होम हवन करून सत्येंद्र महादेव पिंडीची स्थापना सोमवारी (दि.27) रोजी करण्यात आली. प्रथम महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज यांच्या हस्ते महादेवाच्या पिंडीची व नंदीची पूजा करण्यात येऊन सत्येंद्र महादेव मंदिर असे नाव देण्यात आले.

सिडको वाळूज महानगर 1 येथील साई रेजन्सी सोसायटी मधील नागरिकांनी महादेव मंदिर स्थापनेचे संकल्पन करून
महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज यांची रविवारी (दि.19) रोजी भेट घेतली. यावेळी शांतिगिरी महाराज यांनी मार्गदर्शन करून पूजा-पाठ करुन संत्येंद्र महादेव असे नाव दिले. त्यानंतर सोसायटी मधील नागरीकांनी सोमवारी (दि.27) रोजी पुर्ण विधिवत पूजा करुन सायंकाळी पिंडीची स्थापना केली.

सिडको वाळूज महानगर 1 येथे सत्येंद्र महादेव मंदिर स्थापने प्रसंगी होम हवन करताना साई रेजन्सी सोसायटी मधील नागरिक.

ही विधी – लक्ष्मी गजानन सिरसाठ, सुवर्णा संजय सांभाळकर, रूपाली संदीप लोखंडे, कल्पना शांतीलाल द्वारकुंडे, शितल एकनाथ ठोंबरे, आज्ञा दिनेश सोनवणे, दुर्गा विष्णुपंत कचकुरे या सात जोडप्यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर सर्वांनी प्रसादाचा लाभ घेतला. या कार्यक्रमाला संजय मोडके, जनार्धन अण्णा रिठे, संजय भालेराव, अंकुश माळवदे, सचिन वाघमारे, भाऊसाहेब गवते, विरेंद्र यादव, राजू ढोले, गणेश चंद्रे, शांतीलाल राठोड, रमेश शिंदे, विलास येळेकर, सुधाकर ढोले, दिनेश कचकुरे, एकनाथ हांडे, अशोक ठोकळ, परेश घुले, गणेश सदामस्थुल, सुरेश अवचार, अनिल खरात, सचिन कासार, प्रदीप पाटिल, अमरदीप पाटिल, चक्रधर पाडोळे, रामावतार गौंड यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!