July 23, 2024
Home » उघड्यावर मास विक्री; सिडकोतील महिला आक्रमक

वाळूज महानगर ; न्यूज मराठवाडा वृत्तसेवा :
वाळूज महानगरातील सिडको येथील साईनगरात सुरू असलेल्या विविध धार्मिक स्थळाजवळील मच्छी व मांस विक्रेत्यांची दुकाने बंद करावी या मागणीसाठी रविवारी (दि.१९) सायंकाळी महिलांनी श्रद्धा पार्क येथे ठिय्या आंदोलन केले.


सिडको साईनगर जवळील श्रद्धा पार्कच्या परिसरात बालाजी मंदिर यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व इतर धार्मिक स्थळे आहेत. या धार्मिक स्थळांकडे परिसरातील महिला, पुरुष, लहाण बालके यांच्यासह वृद्ध येथे दर्शनासाठी येत असतात. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून मंदिरांकडे जाणाºया रस्त्यांवर ठिकठिकाणी मच्छी व मांस विक्रेते आपली दुकाने थाटून बसलेली आहेत. यामुळे दर्शनासाठी येणाºया भाविकांना याचा मोठा त्रास सहन होत असून परिसरात दुर्गंधी पसरलेली असते. शिवाय वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत. ही सर्व दुकाने पोलीस प्रशासनाने तत्काळ हटवावी अशी मागणी करत शेकडो महिलांनी आंदोलन केले. पोलिसांनी मध्यस्थी करुन उघड्यावर मास विक्री करणाऱ्या दुकानदारांना दुकाने न लावण्याचे सांगितले. यावेळी वैशाली चौधरी, अनिता डहारिया, संजीवनी सोनवणे, लक्ष्मी मोगल, ललिता खोपडे, कमल बनकर, सुनिता म्हस्के, शर्मिला शेट्टी, अनिता बोरुडे, प्रतिभा रोगटे, प्राची भोसले, जयश्री घुले, मंगल पाटील, वृषाली पाटील आदी महिलांचा सहभाग होता.

——-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!