July 20, 2024
Home » महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले; बजाजनगरातील घटना

वाळूज महानगर; न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : पती- पत्नी भाजीपाला खरेदी करुन दुचाकीवरून घरी येत असतांना पाठीमागून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तिनी पाठीमागे बसलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावल्याची घटना बजाजनगर येथे (दि ९ मार्च ) गुरुवार रोजी सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास घडली.

स्मिता चंद्रकांत रावस, ह्या आरएम १३२/४ चिंचवन कॉलनी बजाज नगर, छत्रपती संभाजीनगर पती व मुलासह राहतात पती चंद्रकांत रावस हे कंपनीत काम करतात व स्मिता ह्या शिक्षिका आहे. दि ९ मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान पती-पत्नी दुचाकी क्रमांक एम एच २० इव्ही ३८२१ वर बसुन भाजीपाला खरेदी करण्यासाठी जयभवानी चौक येथील भाजी मंडई येथे गेले. भाजीपाला खरेदी करून सुमारे साडेसात वाजेच्या दरम्यान जय भवानी चौक रोडने घरी येत असताना पाठीमागुन येणाऱ्या मोटार सायकलवरून दोन अज्ञात व्यक्तिनी स्मितायांच्या गळ्यातील सोन्याचे दिड तोळ्याचे मनमंगळसुत्र बळजबरीने हिसकावुन घेवुन पळुन गेले त्यावेळी चंद्रकांत रावस गाडीवरुन पडल्याने त्यांचे पायाला मार लागला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चेतन ओगले हे करीत आहे.

*******

Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

Huren Slowakei – Erotische Schönheiten

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!