July 23, 2024
Home » छत्रपती संभाजीनगर नामकरणाला विरोध करणाऱ्या खा जलील यांचा छावातर्फे पुतळा जाळून निषेध

वाळूज महानगर; न्यूज मराठवाडा वृत्तसेवा :
औरंगाबाद जिल्ह्याचे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण करण्यात आले. या नामकरणाला एम आय एमचे खा. इम्तियाज जलील यांनी विरोध करत जिल्ह्याचे औरंगाबाद हेच नाव ठेवावे यासाठी आंदोलन सुरू केले. या आंदोलनात औरंगजेब यांचा फोटो वापरल्याने नागरिकांत तीव्र संतापाची लाट उसळली असून या विरोधात अखिल भारतीय छावा संघटनेने आक्रमक पवित्रा घेत वाळूज येथे खा.इम्तियाज जलील यांचा पुतळा जाळून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.


औरंगाबाद जिल्ह्याचे संभाजीनगर असे नामकरण व्हावे अशी गेल्या अनेक वर्षापासून मागणी होती. नुकतेच राज्याच्या नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राने मान्यता दिली. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर असे नाव देण्यात आले. मात्र एम आय एम पक्षाचा जातीयवादी खासदार इम्तियाज जलील याने एम आय एम च्या उपोषणामध्ये ओरंगजेबचा फोटो वापरून छत्रपति संभाजीनगरचे वातावरण बिघडेल या पद्धतीने गरळ ओकत आहे. यामुळे निषेध म्हणून अखिल भारतीय छावा संघटने कडून जलील चा पुतळा जाळुन निषेध नोंदवला. यावेळी अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर शिरावत पाटील , युवा जिल्हाध्यक्ष अमोल काळे पाटील, जालिंदर पाटील एरंडे, जिल्हाउपाध्यक्ष सुखदेव सोनवणे, नितिन कळातरे, सौरभ घोलप, शिवा सालुंके, मयूर पाटील, अवि पाटील, श्री पाटील, गौरव ठाकुर , गौरव महाले , आकाश घोटुले , नागेश चव्हाण, दिनेश ठाकुर , सागर करहाडे, सौरभ पवार, किरण खरात आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

********


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!